13 August 2020

News Flash

हडसर किल्ल्यावरून दरीत पडल्याने मुंबईतील युवतीचा मृत्यू

हडसर किल्ल्यावर ठाण्यातील सह्य़ाद्री ट्रेकर्स फाऊं डेशनकडून श्री शिवजयंती निमित्त दुर्ग स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती.

सिद्धी सुनील कामठे

पुणे : जुन्नर परिसरातील हडसर किल्ल्यावर श्री शिवजयंतीनिमित्त दुर्ग स्वच्छता मोहिमेसाठी मुंबईतील एका गटाबरोबर आलेल्या युवतीचा दरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी घडली. सिद्धी सुनील कामठे (वय २०, सध्या रा. चिंचपोकळी, मुंबई, मूळ रा. फुरसुंगी, हडपसर, पुणे) असे दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या युवतीचे नाव आहे.

जुन्नरहून तेरा किलोमीटर अंतरावर हडसर किल्ला आहे. हडसर किल्ल्यावर ठाण्यातील सह्य़ाद्री ट्रेकर्स फाऊं डेशनकडून श्री शिवजयंती निमित्त दुर्ग स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार होती. या मोहिमेत गिर्यारोहण संस्थेतील ३५ सदस्य सहभागी झाले होते. गिर्यारोहकांच्या गटात सिद्धी होती. सकाळी साडेदहाच्या सुमारास गिर्यारोहकांचा गट अवघड अशा पायवाटेवरून किल्ल्यावर जात होता. त्यावेळी गवतावरून सिद्धीचा पाय घसरला आणि काही कळण्याच्या आत ती दरीत पडली.

या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या सिद्धीला तातडीने ग्रामस्थांच्या मदतीने दरीतून बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. जुन्नर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असल्याची माहिती जुन्नर पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2020 2:10 am

Web Title: hadpsar fort mumbai woman dies after falling valley akp 94
Next Stories
1 एकस्व अधिकार, बौद्धिक संपदेतील फरक विद्यापीठाला कळेना!
2 लोणावळा-दौंडसाठी ‘डेमू’
3 शहरात चार हजार ठिकाणी ‘क्यूआर कोड’
Just Now!
X