08 December 2019

News Flash

बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड यांची १६ कोटींची फसवणूक

२०११ मध्ये गायकवाड दाम्पत्याने तीन कंपनीत पैसे गुंतवले होते

बीव्हीजी ग्रुपचे मालक हणमंतराव गायकवाड आणि पत्नी वैशाली गायकवाड यांची तब्बल १६ कोटी ४६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून विनोद जाधव व त्यांची पत्नी सुवर्णा जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गायकवाड दाम्पत्याने वेगवेगळ्या तीन कंपनीत पैसे गुंतवले होते. त्याचा परतावा अथवा समभाग न देता त्यांची फसवणूक केली गेली आहे. घटनेचा अधिक तपास चिंचवड पोलीस करत असून मार्च २०११ मध्ये बी.व्ही.जी प्रीमिअर प्लाझा हाऊस, जुना मुंबई पुणे रोड येथे ही घटना घडलेली आहे.

पोलिसांनी दिललेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव दाम्पत्याच्या तीन कंपन्या असून ते औषधांचा व्यवसाय करतात. त्यांचे मुख्य कार्यलय हे पुण्याच्या विमाननगर येथे आहे. संबंधित दाम्पत्य हे फिर्यादी गायकवाड यांच्या कार्यलयात भेटायला गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या कंपनी विषयी माहिती देऊन त्या सध्या नफ्यात असल्याचे सांगितले. तसेच, आपण ही सदर कंपनीमध्ये गुंतवणूक करावी त्याचा आपल्याला फायदा होईल व गुजरात येथे देखील कंपनी विकत घेतल्याचे सांगितले गेले. या सर्व माहितीवर विश्वास ठेवून फिर्यादी यांची पत्नी वैशाली गायकवाड यांनी तिन्ही कंपनीत १६ कोटी ४५ हजार रुपये गुंतवले. गुंतवणूक केल्यानंतर तिन्ही कंपनीत २६ टक्के समभाग देण्याचे त्यांना कबुल केले गेले होते. परंतु, अद्यापही तसे केले गेले नाही शिवाय रक्कम देखील परत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, हणमंतराव गायकवाड यांना एका कंपनीच्या संचालकपदी देखील नियुक्त करण्यात आले होते. मात्र त्यांना कंपनीच्या आर्थिक व्यवहाराबाबत अलिप्त ठेवण्यात आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे १६ कोटी ४५ लाख रुपयांची गुंतवणुकीच्या रकमेचा समभाग अथवा त्याचा परतावा व मूळ मुद्दल न देता फसवणूक करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास चिंचवड पोलीस करत आहेत.

First Published on July 19, 2019 6:29 pm

Web Title: hanamantrao gaikwad has fraud of 16 crores msr 87
Just Now!
X