10 July 2020

News Flash

कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला प्रकरणातील पाच कोटी ७२ लाख रुपये परत

सायबर पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे रक्कम जमा करण्यात यश

सायबर पोलिसांच्या पाठपुराव्यामुळे रक्कम जमा करण्यात यश

पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी ४२ लाख रुपये लांबविण्यात आल्याप्रकरणी हाँगकॉँग येथील हेनसेंग बँकेत चोरटय़ाने जमा केलेल्या रकमेपैकी ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये पहिल्या टप्यात बँकेला परत करण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे.

सायबर पोलिसांकडून या प्रकरणात पाठपुरावा करण्यात येत होता. सायबर चोरटय़ांनी हाँगकाँग येथील हेनसेंग बँकेतील एका खात्यात १३ कोटी ९२ लाख रुपये जमा केले होते. सायबर पोलिसांकडून बँकेतील अधिकाऱ्यांबरोबर संपर्क साधण्यात आला होता  तसेच हाँगकाँग पोलिसांचे साहाय्य या प्रकरणात घेण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास हाँगकाँग पोलीस दलातील अधिकारी लूंग यांच्याकडे देण्यात आला होता.

परराष्ट्र दूतावासाकडून पाठपुरावा करण्यात येत होता. त्यानंतर खात्यात जमा झालेली रक्कम गोठविण्यात आली होती तसेच काँसमॉस बँकेकडून हाँगकाँग येथील न्यायालयात दाद मागण्यात आली होती. हेनसेंग बँकेकडून गोठविण्यात आलेल्या रकमेपैकी पहिल्या टप्यात ५ कोटी ७२ लाख ९५ हजार ८७ रुपये परत मिळवण्यात यश आले आहे.

सायबर गुन्हे शाखेच्या तत्कालिन पोलीस उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेत नेमणुकीस असलेल्या ज्योतिप्रिया सिंग, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करण्यात आला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे, सहाय्यक निरीक्षक सागर पानमंद, अजित कु ऱ्हे, संतोष जाधव यांनी ही कामगिरी केली.कॉसमॉस बँकेच्या गणेशखिंड रस्त्यावरील सव्‍‌र्हर यंत्रणेवर ११ ऑगस्ट २०१८ रोजी सायबर हल्ला करण्यात आला होता. चोरटय़ांनी बँकेतील ९४ कोटी ९२ लाख रुपये लांबविले होते. त्यापैकी काही रक्कम परदेशातील बँक खात्यात वळविण्यात आली होती. आतापर्यंत या प्रकरणात सायबर पोलिसांनी मुंबई, मुंब्रा, भिवंडी परिसरातून १४ जणांना अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2020 3:21 am

Web Title: hang seng bank in hong kong returns over rs 5 crore to cosmos bank zws 70
Next Stories
1 सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत महाराष्ट्र शासनाने भूमिका स्पष्ट करावी – योगेंद्र यादव
2 Maharashtra HSC Board Exams 2020 : बारावीची परीक्षा आजपासून
3 त्याच जागी पुन्हा तसाच फलक
Just Now!
X