News Flash

आमच्या खात्यात जमा झालेले पैसे परत घ्या

कष्टकरी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगळे आंदोलन

(संग्रहित छायाचित्र)

कष्टकरी महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयात आगळे आंदोलन

पुणे : ‘आमच्या खात्यामध्ये जमा झालेले पैसे परत घ्या’, अशी मागणी करीत कष्टकरी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी आगळेवेगळे आंदोलन केले.  देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या साहाय्य योजनेतील फसवणुकीने जमा केलेले हे पैसे परत घ्या आणि ज्याचे त्याला द्या. हे कारस्थान करणाऱ्यांचा तपास करून त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करणाऱ्या महिलांच्या आंदोलनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारीही चक्रावले.

करोनाने गांजलेल्या, टाळेबंदीने पिडलेल्या आणि रोजगार गमावलेल्या सध्याच्या काळात स्वयंसेवी संस्थेच्या म्हणवणाऱ्या तीन महिलांनी हडपसर भागातील घरकामगार , गृहसेविका, कष्टकरी महिलांना गाठून केंद्र सरकारच्या योजनेतून प्रत्येकी १५ हजार रुपयांची मदत करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी आधारकार्ड, छायाचित्र, शिधापत्रिका आणि बँकेचे पासबूक द्या. काही दिवसातच जमा झालेल्या रकमेतील निम्मे आम्हाला परत करावे लागतील, असे या महिलांना सांगण्यात आले. अल्पशिक्षित, निरक्षर महिलांनी आपली कागदपत्रे संस्थेच्या महिलांच्या हवाली केली. २३ एप्रिल रोजी काही महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले. त्यानंतर संस्थेच्या महिलांनी त्यांच्याकडे निम्मी रक्कम मागण्यास सुरुवात केली. दरम्यान, देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या योजनेचे पैसे कष्टाची कामे करणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा झाल्याचे या महिलांना समजले. त्याबाबतची माहिती घेतल्यानंतर तसा प्रकार झाल्याची कष्टकरी महिलांची खात्री झाली.

या फसवणुकीने संतप्त झालेल्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार आणि अखिल भारतीय बहुजन सेनेचे संस्थापक नीलेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कचेरीवर निदर्शने केली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांना त्यांनी मागणीचे निवेदन दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 2:16 am

Web Title: hard working women protest for money in the collector s office zws 70
Next Stories
1 ११ पोलिसांची तडकाफडकी मुख्यालयात बदली
2 संचारबंदीतही आधार नोंदणी, दुरुस्तीस मुभा
3 नियम पाळून संशोधन कामकाज
Just Now!
X