News Flash

जय गणेश व्यासपीठांतर्गत मध्य पुण्यातील २७२ गणेशोत्सव मंडळांतर्फे आरोग्योत्सवास प्रारंभ

बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग आणि होम आयसोलेशनसाठी प्रशासनाला मदत होणार

पुणे शहरात करोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आता पुणे शहरातील गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. जय गणेश व्यासपीठच्या माध्यमातून मध्य पुण्यातील २७२ पेक्षा अधिक गणेशोत्सव मंडळांनी आरोग्योत्सवाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरुन सेवेला सुरुवात केली आहे.

या उपक्रमा अंतर्गत बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टेक्ट ट्रेसिंग आणि होम आयसोलेशनसाठी प्रशासनाला तात्काळ माहिती देण्यास मदत होणार आहे. शिवाय संबधित रुग्णास लवकरात लवकर उपचार मिळण्यास देखील मदत आहे.

पुणे शहरातील बुधवार पेठेतील कोतवाल चावडी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या एसटीडी बुथ येथे कोविड मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे. या केंद्राचे उदघाटन पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे,कोविड 19 लोकसहभाग सह नियंत्रण अधिकारी  राजेंद्र निंबाळकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने म्हणाले की, शहरातील वाढती करोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता. कसबा विधानसभा मतदारसंघातील २७२ हून अधिक गणेश मंडळं कोविड मुक्त अभियानात सहभागी झाले आहे. या माध्यमातुन एखादा रुग्ण आढळल्यास त्या व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यास मदत होणार आहे. यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविण्यास निश्चित मदत होईल. आता कसबा भागातून सुरुवात झाली असून, शहरातील अनेक मंडळे या उपक्रमात जोडली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 21, 2020 6:28 pm

Web Title: health festival started by 272 ganeshotsav mandals in central pune under jai ganesh platform msr 87 svk 88
टॅग : Ganeshotsav
Next Stories
1 श्रावणातील मंगळागौरीवरच टाळेबंदी
2 टाळेबंदीत रेल्वेकडून पायाभूत कामे
3 शहरात आपत्कालीन रिक्षाही बंद
Just Now!
X