करोनाच्या मृत्यूंची संख्या लपवली जात असल्याचा विरोधकांचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेटाळून लावला आहे.  महाविकासआघाडीचे नेते म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार या सर्वांचं मत आहे की, राज्यातील जनतेपासून कोणतीही गोष्ट लपवायची नाही. अत्यंत पारदर्शकता व प्रामाणिकता हाच महाविकासआघाडीचा सगळ्यात महत्वाचा धर्म म्हणून आपण काम करत आहोत. त्यामुळे कुठलाही मृत्यू लपवण्याचं कारण नाही. राज्य शासनाचा हेतू स्वच्छ आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात माध्यमा प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देताना बोलत होते.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, पर मिलियन केसेस हा एक महत्वाचं मानक समजलं जातं, टेस्टिंगच्या बाबतीत. आपल्या संपूर्ण देशात सर्वात जास्त टेस्टिंग म्हणजे पर मीलियन टेस्टिंग २२ हजार हे मुंबईत झालेलं आहे. त्या खालोल खाल पुणे आहे, पुण्यात १५ हजार टेस्टिंग पुण्यात झालं आहे. त्यामुळे पुण्यात टेस्टिंग कमी होत आहेत. असं म्हणनं अजिबात योग्य नाही. अत्यंत चांगल्या पद्धतीने टेस्टिंग केल्या जात आहेत.

आयसीएमआरचा प्रोटोकॉल शंभर टक्के पाळला जातो. ज्यांना लक्षणं आहेत, त्यांनी टेस्ट केली पाहिजे. जे हायरिस्क कॉन्टॅक्ट असतात त्यांना क्वारंटाइन करून त्यांच टेस्टिंग केली पाहिजे, या संदर्भातील सर्व काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्यामुळेच खऱ्या अर्थाने करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ज्या राज्यांमध्ये टेस्टिंग होत नाहीत, त्या ठिकाणी संख्या वाढताना दिसत नाही. हे चित्र भविष्याच्या दृष्टीने योग्य नाही, असेही ते यावेळी म्हणाले.