07 March 2021

News Flash

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंच्या अटकपूर्व जामिनावर उद्या सुनावणी

पुणे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार आनंद तेलतुंबडे यांच्यावर माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

आनंद तेलतुंबडे (संग्रहित छायाचित्र)

एल्गार परिषदेच्या खटल्यातील आरोपी डॉ. आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होऊ शकली नाही, ही सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यामुळे आता उद्या (बुधवारी) त्यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. पुणे पोलिसांनी मंगळवारी यासंदर्भात आपले म्हणणे न्यायालयामध्ये मांडले.

विशेष सत्र न्यायाधीश किशोर वडणे यांच्या न्यायालयाने हा निर्णय दिला. तर सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी आणि आरोपीचे वकील रोहन नहार यांनी या सुनावणीत काम पाहिले.

पुणे पोलिसांनी सादर केलेल्या अहवालानुसार आनंद तेलतुंबडे यांच्यावर माओवादी संघटनेशी संबंध असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 4:43 pm

Web Title: hearing tomorrow on anticipatory bail of anand talutband regarding elgar parishad
Next Stories
1 Video: तलवारीने कापला केक, शिवसेना पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा
2 आकुर्डीत पेपर टाकणाऱ्या १७ वर्षांच्या मुलाची आत्महत्या
3 समाज कल्याणचे अधिकारी काम करीत नसल्याने महिलेचा टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न
Just Now!
X