07 March 2021

News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये शिरलं पाणी; चौकांना तलावाचं स्वरूप

लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता

पिंपरी-चिंचवड शहरात रात्री मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्त्याला तलावाचे स्वरूप आलं होतं. शहरात काही ठिकाणी झाड पडल्याच्या, घरात पाणी शिरलं असल्याच्या तसंच मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचल्याच्या २९ घटना घडल्या आहेत. या मुसळधार पावसामुळे सर्वसामान्यांसह अग्निशमन दलाच्या जवानांची देखील धावपळ झाली. दरम्यान, पुणे जिल्ह्याधिकऱ्यांनी लोणावळा परिसरातील पर्यटनस्थळावरील बंदी उठवल्याने लोणावळ्यातील भुशी धरणासह इतर ठिकाणी गर्दी होण्याची शक्यता आहे. लोणावळ्यात बुधवारी रात्री ७६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

पिंपरी-चिंचवडसह परिसरात दोन दिवसांपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. मात्र रात्री नऊच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्री बारा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू होता. त्यानंतर काही प्रमाणात पाऊस ओसरला होता. मात्र, मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत होत्या. दरम्यान, शहरात सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. शिवाय, अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अख्खी रात्र जागून काढण्याची वेळ आली.

सांगवी, चिखली, निगडी प्राधिकरण, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, मोरवाडी, थेरगाव अशा अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटनांसह झाड पडल्याची घटना घडली.

लोणावळा आणि मावळ परिसरात पावसाचा जोर..
पिंपरी-चिंचवड शहरात ज्या प्रमाणे मुसळधार पाऊस झाला त्याचप्रमाणे मावळ आणि लोणावळा परिसरात पाऊस कोसळला. ढगांच्या गडगडाट आणि विजांचा कडकडाटात मुसळधार पाऊस झाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 10:02 am

Web Title: heavy rain in pimpri chinchwad people may gather in lonavla kjp 91 gy 87
Next Stories
1 अतिवृष्टीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द
2 पुण्यात जलधारांचा कहर
3 नदीसंवर्धन प्रकल्पाला भूसंपादनाचा अडसर
Just Now!
X