08 March 2021

News Flash

पुण्यात वादळी पावसाच्या सरी

पुणे शहराच्या बहुतांश भागात शनिवारी दुपारी वादळी पावसाच्या सरी बरसल्या.

पुणे शहराच्या बहुतांश भागात शनिवारी दुपारी वादळी पावसाच्या सरी बरसल्या

पुणे शहराच्या बहुतांश भागात शनिवारी दुपारी वादळी पावसाच्या सरी बरसल्या. या पावसाची सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ९.६ मिलिमीटर इतकी नोंद झाली. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारीसुद्धा वादळी पावसाच्या मोठय़ा सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्यात शुक्रवारपासूनच अंशत: ढगाळ वातावरण कायम होते. त्याचा परिणाम म्हणून हवेत उष्मा जाणवत होता. शनिवारीसुद्धा पुण्यात असेच वातावरण होते. सकाळच्या उष्म्यानंतर दुपारी तीन-साडेतीनच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरींना सुरुवात झाली.
सुमारे तासभर जोरदार पाऊस पडला. त्यानंतरही काही काळ हलक्या सरी पडतच होत्या. या पावसामुळे सायंकाळच्या वेळी मात्र हवेत गारवा निर्माण झाला. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, रविवारी आणि सोमवारी मोठय़ा प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2015 12:29 am

Web Title: heavy rain in pune
टॅग : Heavy Rain
Next Stories
1 महापालिका नियुक्त करणार मंत्रालय अधिकारी
2 भावी डॉक्टरांना मिळाले ‘एथिक्स’चे धडे!
3 ‘तेल व नैसर्गिक वायूंची साठवणूक, संवर्धन व उत्पादनवाढ आव्हानात्मक’ – डॉ. सदानंद जोशी
Just Now!
X