28 February 2021

News Flash

अतिवृष्टीमुळे पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द

पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं

पुणे शहर आणि जिल्ह्याला बुधवारी दुपारपासून पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. दरम्यान अतिवृष्टी आणि चक्रिवादळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. आज होणाऱ्या सर्व नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षांचे सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येईल अशी माहिती कुलसचिव प्रफुल्ल पवार यांनी दिली आहे.

जोरदार पावसामुळे अनेक सोसायट्यांमध्ये तर पुणे शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी शिरलं होतं. आणखी दोन दिवस असाच मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे. यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आलं आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. पण बुधवारी दुपारपासून पावसाचा जोर वाढल्याने शहराच्या मध्यभागी म्हणजेच पेठांचा सर्व भाग पाण्याने साचला होता. ५० हून अधिक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले होते. हे पाणी काढण्यासाठी नागरिकांची एकच धावपळ सुरू होती. मदतीसाठी अग्निशामक विभागाच्या कार्यालयमध्ये सतत फोन सुरु होते.

पावसात अनेक नागरिकांच्या गाड्या देखील वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर त्याच दरम्यान शहरातील चंदननगर पोलीस स्टेशनमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याची घटना घडली. यामुळे पोलिसांना टेबलवर बसून काम करावे लागलं.

खडकवासला धरणातून ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदी पात्रात सोडले
पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या खडकवासला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून धरण क्षेत्रातून नदी पत्रात ३४२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सात वाजता सोडण्यात आला आहे. तसेच परिस्थितीनुसार पाण्याचा विसर्ग सोडला जाणार असल्याचा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2020 7:38 am

Web Title: heavy rain in pune cause waterlogging svk 88 sgy 87
Next Stories
1 पुण्यात जलधारांचा कहर
2 नदीसंवर्धन प्रकल्पाला भूसंपादनाचा अडसर
3 पुण्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता
Just Now!
X