पुणे : जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे राज्य शासनाकडून ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आतापर्यंत एक लाख २३ हजार ४४८ लाभाथ्र्यांच्या खात्यात ३९ कोटी दहा लाख ७९ हजार रुपये म्हणजेच ९० टक्के  नुकसान भरपाई देण्यात आली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ६७ हजार ४६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. बाधितांमध्ये शेतपिके , कच्ची आणि पक्की घरे, पशुधन यांबाबत पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल पाठवण्यात आला होता. त्यानुसार दिवाळीपर्यंत (१५ नोव्हेंबर) लाभार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, दिवाळीत बँकांना सलग सुट्ट्या आल्याने दिवाळीपूर्वी १०० टक्के  नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. २३ नोव्हेंबरपर्यंत ९० टक्के  लाभाथ्र्यांच्या बँक खात्यात ३९ कोटी दहा लाख ७९ हजार रुपये रक्कम वर्ग करण्यात आली आहे.

जिल्ह्यात इंदापूर तालुक्यात सर्वाधिक १४ हजार ३९५ हेक्टर बाधित क्षेत्र असून ३९ हजार ३८७ शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यापैकी २५ हजार ५४० लाभार्थ्यांच्या खात्यात सात कोटी ६८ लाख ४१ हजार रुपयांचे वाटप झाले आहे. बारामतीमध्येही १४ हजार १८४ हेक्टर बाधित क्षेत्रातील २५ हजार ५४० शेतकऱ्यांना १०० टक्के  नुकसान भरपाई देण्यात आली आहे. बारामतीसह जुन्नर आणि दौंड या तालुक्यांमध्येही १०० टक्के  भरपाई दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून अद्यापही भरपाई देण्याचे काम सुरू असून अनेक लाभाथ्र्यांच्या बँक खात्याचा किं वा आधार क्रमांक चुकीचा असल्याच्या तांत्रिक कारणांमुळे थेट बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब लागत आहे. या तांत्रिक दुरुस्त्या दूर करून तातडीने उर्वरित लाभार्थ्यांना भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.