पुणे आणि परिसरात मंगळवारी दुपारपासून जोरदार पाऊस झाला. सकाळी भुरभुर आणि अधूनमधून रिमझिम पडणारा पासून दुपारनंतर लागून राहिला. संध्याकाळी जवळपास अडीच ते तीन तास पाऊस नुसता कोसळला आणि रात्रीही तो सुरूच होता.
‘भारतीय हवामानशास्त्र विभागा’च्या आकडेवारीनुसार (आयएमडी) संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पुण्यात ४ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर साडेआठपर्यंत केवळ तीन तासांत २१.२ मिमी पाऊस पडला आहे. पुण्याच्या आसपासच्या भागात देखील जोरदार पाऊस झाला. ‘सिटिझन सायन्स नेटवर्क’ या खासगी संस्थेने शहरात घेतलेल्या पावसाच्या नोंदीनुसार वारज्यात ३५ मिमी, तर नव्या पेठेत २९ मिमी पावसाची नोंद झाली असून सिंहगड रस्ता (२५ मिमी), कोथरूड (२४ मिमी), चिंचवड (२४ मिमी) आणि  हिंजवडीतही (२२ मिमी) मोठा पाऊस पडला.
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्हय़ांत पावसाने मंगळवारी दमदार हजेरी लावली असून, अनेक ठिकाणी पंधरा दिवसांनंतर प्रथमच संततधार पाऊस अनुभवायला मिळतो आहे. नगरमध्ये साडेपाचपर्यंत १८ मिमी, साताऱ्यात १५ मिमी, सांगलीमध्ये १२ मिमी, तर कोल्हापूरला १४ मिमी पावसाची नोंद झाली, तर सोलापूरमध्ये २ मिमी पावसाची नोंद झाली.महाबळेश्वरला प्रचंड पाऊस झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत महाबळेश्वरला १८२ मिमी पावसाची नोंद झाली व त्यानंतरही पाऊस सुरूच होता.
महाबळेश्वरला २४ तासांत तब्बल ३८९.३ मि.मी. (१६ इंच) पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. महाबळेश्वर परिसरात सोमवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, विशेषत: वेण्णा जलाशयाशेजारील पुण्याहून येणाऱ्या मुख्य रस्त्याला नदीचे रूप आले होते. पुणे ते महाबळेश्वर दरम्यानची वाहतूकही त्यामुळे दिवसभर विस्कळीत झाली.

Gutkha worth 11 lakh 60 thousand seized at Maisal check post
सांगली : म्हैसाळ तपासणी नाक्यावर ११ लाख ६० हजाराचा गुटखा जप्त
weather update marathi news, heat wave maharashtra marathi news
पावसाने माघार घेताच उकाड्यात प्रचंड वाढ, काय आहे हवामानाचा अंदाज जाणून घ्या
Water supply to villages by tankers in Pune Satara Sangli and Solapur districts pune news
पश्चिम महाराष्ट्र टँकरग्रस्त; सर्वाधिक झळ सातारा, पुण्याला
sangli murder marathi news
सांगली: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून