08 July 2020

News Flash

पिंपरी-चिंचवडसह पुणे शहराला मुसळधार पावसानं झोडपलं

अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराला मंगळवारी मुसळधार पावसानं झोडपलं.

पिंपरी-चिंचवड शहरात सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहर रेड झोनमधून वगळण्यात आल्याने अनेक नागरिक दैनंदिन व्यवहारांसाठी घराबाहेर पडले होते. त्यांची आज चांगलीच तारांबळ उडाली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पावसाला जोरदार सुरुवात झाली त्यानंतर तास दीड तास शहरात चांगला पाऊस झाला.

निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम २ आणि ३ जून रोजी पश्चिम किनारपट्टीसह मध्य, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात जाणवणार असल्याचे भाकीत यापूर्वीच हवामाना खात्याने वर्तवले होते. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड परिसरात ढगाळ वातावरण होते. त्यात आज पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. दरम्यान, शहरातील काही भागातील वीज खंडित झाली होती. तर अनेक सखल भागात पाणी साठले होते. यामुळे नागरिकांना चालण्यासाठी कसरत करावी लागली.

शहराला रेड झोनमधून वगळल्यानंतर दुकाने सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे अनेक नागरिक हे सायंकाळच्या सुमारास खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेले असतानाच पावसाने सर्वांना झोडपून काढले.

पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

राज्यात निसर्ग चक्रीवादळाचा परिणाम सर्वत्र झाला असून, पुणे शहर आणि आसपासच्या भागात मंगळवारी सायंकाळनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना वातावरणात गारवा निर्माण झाल्याने हायसे वाटले.

निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहराच्या आसपासच्या भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याचे पहावयास मिळाले. तर पुढील दोन दिवस राज्यातील बहुतांश भागात मध्यम आणि तुरळक पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2020 8:40 pm

Web Title: heavy rains lashed pimpri chinchwad and pune city due to effect of cyclone nisarga aau 85 kjp 91
Next Stories
1 पुण्यात माकडांवर होणार करोना लसीची चाचणी
2 पिंपरी-चिंचवडमध्ये ‘पोलीस मित्र’लाच पोलिसांकडून बेदम मारहाण
3 राज्यातील पहिली घटना: विद्यार्थीनीकडे घरभाडे मागणं महिलेच्या आलं अंगलट; पोलिसांनी दाखल केला गुन्हा
Just Now!
X