सध्या जगाच्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘करोना थैमान नाटय़ामध्ये भरडल्या गेलेल्या पडद्यामागच्या कलाकारांना ‘आम्ही प्रयोगशील नाटकवाले’ या प्रायोगिक रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांच्या समूहातर्फे मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. शुक्रवारी (२७ मार्च) जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून पडद्यामागच्या ४१ कलाकारांना प्रत्येकी तीन हजार ६६० रुपयांची मदत पोहोचविण्यात येणार आहे.

करोना थैमान नाटय़ इतके विद्रूप आहे की इथे आज न वाजणाऱ्या तीन घंटा या सर्जन निर्मितीच्या नसून जणू सर्जन स्थगितीच्या आहेत. त्या भयप्रद शांततेने प्रत्येकाचे मन काळवंडले गेले आहे. असे अनेक विषाणूंचे खेळ जागतिक रंगभूमीने पाहिले आहेत आणि त्यावर पडदा टाकून पुढच्या नवनिर्मितीची घंटाही वाजवली आहे. या प्रगाढ आत्मविश्वासाने सध्याच्या विपरीत दृश्यात एक छोटा हातभार लावायचा म्हणून रंगभूमीवरील काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांना सध्याच्या आर्थिक अडचणीच्या काळात मदतीचा हात दिला आहे. ही मदत अल्प आहे याची आपल्याला नम्र जाणीव आहे. गेल्या फक्त दोन दिवसात दूरध्वनीद्वारे संपर्क करून प्रायोगिक रंगभूमी क्षेत्रातील कलाकार स्वेच्छेने एकत्र  येत दीड लाख रुपये संकलित केले. रंगभूमी सेवक संघ पुणे या संस्थेने दिलेल्या यादीनुसार त्यांच्या फक्त पुण्यातीलच ४१ पडद्यामागच्या कलाकारांना जागतिक रंगभूमी दिनाचे महत्त्व मनात ठेवून ही रक्कम दिली आहे. या रकमेतून त्यांच्या  कुटुंबाला एक महिना पुरेल इतका जीवनावश्यक शिधा विकत घेता येईल ही त्या मागची कल्पना आहे. ही  रक्कम रंगभूमी सेवक संघाचे अध्यक्ष सुरेंद्र गोखले यांनी त्या ४१ कलाकारांना व्यक्तिगत रित्या पोहोचवण्याची जबाबदारी घेतली आहे. ‘आम्ही प्रयोगशील नाटकवाले’मध्ये आसक्त, नाटक कंपनी, आजकल, थिएट्रॉन आणि नाटकघर, पुणे या संस्थांतील कलाकारांसह लेखन, अभिनय, दिग्दर्शन,नेपथ्य, संगीत, छायाचित्रकला, रंगभूषा, नाटक गट या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांचा सहभाग आहे.

crime
आमदार गीता जैन यांच्या संस्थेतील प्रकार; छायाचित्रे चोरून संचालिकेला ब्लॅकमेल, तिघांवर गुन्हा दाखल
vasai, virar, palghar, lok sabha election 2024, Hitendra Thakur
सर्व पक्षांनी मलाच पाठिंबा द्यावा, हितेंद्र ठाकूर यांची चित्रफित प्रसारित
Meenakshi Shinde
आचारसंहितेच्या कालावधीत बचतगटांना आनंद आश्रमातून अनुदान वाटप ? शिवसेनेच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदेंविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार
Understanding the scope and depth of Creative Design and how to pursue a career in it
डिझाईन रंग-अंतरं:ग ‘डिझाईन’ कसं बदलतंय तुमचं जग..!