परिसर संस्थेच्या पाहणीतून वस्तुस्थिती उघडकीस

पुणे : शहरातील विविध रस्त्यांवरील वाहतुकीत बेशिस्त असून वेगमर्यादेचे उल्लंघन वाहनचालकांकडून मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. सर्वेक्षण के लेल्या रस्त्यांमध्ये वेग मर्यादेचे सर्वाधिक उल्लंघन बाणेर रस्त्यावर होत असल्याचे दिसून आले. बाणेर रस्त्यावरून जाणाऱ्या एकू ण वाहनचालकांपैकी ९२ टक्के  वाहनचालक वेग मर्यादा ओलांडतात असे चित्र आहे.

वाहनचालकांकडून नियमांचे सातत्याने उल्लंघन करण्यात येते. यामध्ये शिरस्त्राणाचा वापर न करणे, दुचाकीवर आसन क्षमतेपेक्षा जास्त नागरिकांकडून प्रवास करणे अशा वाहनचालकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. मात्र कोणत्या रस्त्यावर किती वेग मर्यादा निश्चित करण्यात आली आहे आणि त्याचे पालन होते का, याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या प्रकारची कारवाईही होत नाही. त्यामुळे परिसर संस्थेकडून शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करण्यात आले.

mumbai, charkop, Architect s Attempt to fraud , fungible carpet area in MHADA Housing, MHADA Housing Societies charkop, redevlopment of mhada socieities, mhada society charkop, chrkop news,
चारकोपमधील म्हाडा पुनर्विकासात फंजीबल चटईक्षेत्रफळाचा घोटाळा, अधिकाऱ्याच्या दक्षतेमुळे अनर्थ टळला!
Dombivli east, Assistant Commissioner, Notice, Illegal Shop Construction, block road, old jakat naka, gandhi nagar road, kalyan dombivali municipal corporation,
डोंबिवलीत रस्ते अडवून बेकायदा गाळ्यांची उभारणी, ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांकडून नोटीस
dombivli, nandivali, illegal shops, illegal shop construction on road
डोंबिवलीतील नांदिवलीत वर्दळीच्या रस्त्यात बेकायदा गाळ्याचे बांधकाम; शाळा, व्यापारी संकुलांच्या वाहनांना अडथळा
BJP Vijay Wadettiwar criticizes Ajit Pawar and Shinde group gadchiroli
अजित पवार व शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट; वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजपचे गुलाम…’

परिसर संस्थेच्या वतीने शहरातील आठ रस्त्यांवरील वाहतुकीच्या वेगाचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यासाठी वीस दिवस तीन टप्प्यात प्रत्येकी एक-एक तास या प्रमाणे वाहनांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील आठ मार्गावरील ५ हजार ३५६ वाहनांचा वेग स्पीड गन द्वारे तपासण्यात आला. बाणेर, गणेशखिंड, औंध-रावेत, सिंहगड रस्ता, स्वारगेट रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-बंगळुरु महामार्ग आणि पुणे-मुंबई जुन्या महामार्गावर स्वयंसेवकांकडून वेगाची तपासणी करण्यात आली. यामध्ये बाणेर रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांपैकी ९२ टक्के  वाहनचालक वेग मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले. त्या खालोखाल गणेशखिंड रस्ता आणि जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर उल्लंघन होण्याचे प्रमाण प्रत्येकी ९० टक्के  आहे. यामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. औंध-रावेत आणि पुणे-नाशिक महामार्गावरून जाणारे ८० टक्के  वाहनचालक वेग मर्यादा पाळत नाहीत. स्वारगेट रस्त्यावरून जाणारे ८४ टक्के  वाहनचालक वेगाच्या नियमाचे उल्लंघन करतात, असे निदर्शनास आले आहे. तर सिंहगड रस्त्यावरून जाणारे ६७ टक्के  वाहनचालक वेग मर्यादा पाळत नसून पुणे-बंगळुरु महामार्गावरून जाणारे ५५ टक्के  वाहनचालक वेगाच्या मर्यादेचे उल्लंघन करत आहेत, असे निरीक्षण परिसर संस्थेच्या वतीने नोंदविण्यात आले आहे.

‘वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई होत नाही. त्यामुळे ती करावी, अशी संस्थेची मागणी आहे. या संदर्भात पोलीस महासंचालक आणि पुणे पोलिसांनाही पत्र देण्यात आले आहे. आठ

प्रमुख रस्त्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आले,’ असे परिसर संस्थेचे सहयोगी प्रकल्प संचालक संदीप गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

सर्वेक्षण केलेले रस्ते

बाणेर, गणेशखिंड, स्वारगेट रस्ता, औंध-रावेत, सिंहगड रस्ता, पुणे-नाशिक महामार्ग, पुणे-बंगळुरु महामार्ग आणि पुणे-मुंबई जुना महामार्ग.

सर्वेक्षणातील निरीक्षणे

’ तीन रस्त्यांवर वेगांचे उल्लंघन ९० टक्के  चालकांकडून

’ आठपैकी चार रस्त्यांवर सकाळी वेगाचे उल्लंघन

’ वेगाच्या उल्लंघनात सर्व प्रकारच्या वाहने ’ सर्वाधिक ४६

टक्के  दुचाकीस्वारांकडून वेग मर्यादेचे पालन नाही

’ २९ टक्के  चारचाकी वाहनांकडून वेगाचे उल्लंघन

’ १४ टक्के  अवजड वाहनांकडूनही नियमभंग

’ ११ टक्के  तीनचाकी वाहनांचा समावेश

राज्यातील प्रमुख शहरांतही सर्वेक्षण

पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, नागपूर येथेही परिसर संस्थेकडून सर्वेक्षण करण्यात आले. या चारही शहरांत मिळून ३४ रस्त्यांवर एकू ण ३५ हजार वाहनांच्या वेगाची तपासणी करण्यात आली. यामध्ये २६ रस्त्यांवरून जाणाऱ्या वाहनचालकांपैकी ६० टक्के  वाहनचालक वेग मर्यादेचे उल्लंघन करतात, वेग मर्यादेचे उल्लंघन ९० टक्क्यांपेक्षा कमी असलेले पाच रस्ते असून उर्वरित पाच रस्त्यांवर ९० टक्क्यांहून अधिक वाहनचालक वेग मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.