06 July 2020

News Flash

वडगावशेरी मतदारसंघात सर्वाधिक मतदारांची नोंद

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात पुरवणी यादीमध्ये सर्वाधिक तीन हजार ५०४ मतदारांची नोंद करण्यात आली आहे.

संग्रहित छायाचित्र

शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात पुरवणी यादीमध्ये सर्वाधिक तीन हजार ५०४ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. तर, सर्वात कमी २४१ मतदार कसबा पेठ मतदारसंघात नोंदले गेले आहेत. शहरासह जिल्ह्य़ात एकूण ४२ हजार ५८१ मतदार पुरवणी यादीमध्ये वाढले आहेत.

विधानसभा निवडणुकीची पुरवणी मतदारयादी ४ ऑक्टोबरला प्रसिद्ध करण्यात आली. त्यामध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी मतदारसंघात तीन हजार ५०४, शिवाजीनगरमध्ये ६७७, कोथरूडमध्ये एक हजार २८३, खडकवासलामध्ये तीन हजार दोनशे, पर्वतीमध्ये ४१३, हडपसरमध्ये दोन हजार २०८, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये ६०३ आणि कसबा पेठ मतदारसंघात २४१ असे शहरात मिळून १२ हजार १२९ मतदार नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. पिंपरी चिंचवडमधील तीन मतदारसंघांपैकी चिंचवडमध्ये एक हजार ४७३, पिंपरीमध्ये दोन हजार २६० आणि भोसरीमध्ये आठ हजार ६१० असे मिळून १२ हजार ३४३ मतदार समाविष्ट झाले आहेत.

ग्रामीण भागातील दहा मतदारसंघांपैकी जुन्नर मतदारसंघात २९०, आंबेगावमध्ये ६९९, खेड आळंदीमध्ये ८०७, शिरूरमध्ये दोन हजार ६५८, दौंडमध्ये पाच हजार ९१५, इंदापुरात ८६६, बारामतीमध्ये २६५, पुरंदरमध्ये एक हजार ६५९, भोरमध्ये एक हजार ८८८ आणि मावळ मतदारसंघात तीन हजार ६२ असे मिळून १८ हजार १०९ मतदार समाविष्ट करण्यात आले आहेत.

पुणे शहरातील आठ, पिंपरी चिंचवडमधील तीन आणि ग्रामीण भागातील दहा अशा २१ मतदारसंघांमध्ये मिळून एकूण ४२ हजार ५८१ मतदार पुरवणी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या सर्व मतदारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याची संधी मिळणार आहे.

सर्वाधिक मतदार भोसरीमध्ये वाढले

पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागातील २१ विधानसभा मतदारसंघांपैकी सर्वाधिक आठ हजार ६१० मतदार भोसरी विधानसभा मतदारसंघात वाढले आहेत. त्याखालोखाल दौंडमध्ये पाच हजार ९१५ आणि तिसऱ्या क्रमांकावर वडगाव शेरी मतदारसंघात तीन हजार ५०४ मतदार वाढले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 10, 2019 4:27 am

Web Title: highest voter turnout constituency akp 94
Next Stories
1 दत्ता बहिरट यांच्या प्रचाराची धुरा चारूकडे
2 राजकारणाला वाईट म्हणण्यापेक्षा वाईट राजकारण्यांना बाजूला सारा
3 झोपडपट्टीवासीय, स्थानिक रहिवाशांचा कौल महत्त्वाचा
Just Now!
X