26 October 2020

News Flash

पुणे तिथे काय उणे! चक्क बस स्टॉपच गेला चोरीला, शोधून देणाऱ्याला मिळणार बक्षीस

. पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील बस स्टॉप चोरीला

पुण्यातील एक बस स्टॉप चोरीला गेल्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पुण्यातील बी. टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेल्याचा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बस स्टॉप शोधणाऱ्याला पाच हजार रुपयांचं बक्षीस देणारं पोस्टरही लावण्यात आलं आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला फोटो reddit युजर u/ Sudhackar यांनी शेअर केला आहे. सुधाकर यांचा reddit.com वरील हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं पुणे तिथे काय उणे.. अशी कमेंट केली आहे.

@joleneann123 या युजरने हाच फोटो ट्विट केला आहे. फोटो पोस्ट करताना हसण्याची इमोजी आणि पुण्याचा बस स्टॉप चोरीला गेल्याचं म्हटलेय. अनेक नेटकऱ्यांनी या घटनेकडे गमतीनं पाहिलं तर काहींनी आपला राग व्यक्त केला आहे. तर काहींनी जुन्या घटनांचा उल्लेखही केला आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोवरुन असं समजतेय की, बी.टी. कवडे रोडवरील देवकी पॅलेससमोरील बस स्टॉप चोरीला गेला आहे. हा बस स्टॉप शोधून देणाऱ्यांना पाच हजार रुपयांचं बक्षीस देण्यात येणार आहे. हे पोस्टर राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत म्हस्के यांनी लावले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 18, 2020 12:37 pm

Web Title: hilarious poster offers 5000 as reward to anyone who knows about stolen bus stop in pune nck 90
Next Stories
1 अॅमेझॉनचं पार्सल हरवलं; मुंबईकर तरुणाने थेट सीईओकडेच केली ई-मेलद्वारे तक्रार
2 Viral Video: पँटचा गोंधळ झाला अन् रोहित खदखदून हसला
3 Video : चहलची होणारी बायको धनश्री म्हणते…परी हु मै !
Just Now!
X