कोथरूड सर्वेक्षण क्रमांक ६६/२ येथील नव विनायक गृह निर्माण संस्थेच्या जागेतील जैववैविध्य उद्यानासाठी (बायो डायव्हर्सिटी पार्क- बीडीपी) आरक्षित असलेला टेकडीचा भाग जेसीबी लावून फोडण्याचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांनी शनिवारी सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्ह या संस्थेच्या मदतीने थांबवण्यात यश मिळवले.
महात्मा सोसायटी ते चांदणी चौक रस्ता भागात असलेल्या टेकडीजवळ ही गृहनिर्माण संस्था आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जेसीबी यंत्र लावून टेकडी फोडण्यास प्रारंभ केला होता, अशी तक्रार महापालिकेकडे करण्यात आली होती. त्यावर बीडीपी आरक्षणामधून सोसायटीचा ले आउट वगळण्यात आला आहे, असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. मात्र टेकडीफोड तसेच खोदकाम, बांधकाम अशा कामांना महापालिकेची परवानगी नसताना ही कामे केली जात होती.
टेकडी फोडल्यास येणारे पावसाचे पाणी पुढे थेट सोसायटीत घुसण्याचा धोका लक्षात घेऊन स्थानिक रहिवाशांनी सेव्ह पुणे हिल्स इनिशिएटिव्हचे अध्यक्ष दीपक बीडकर, सचिव ललित राठी यांना सुरू असलेला प्रकार कळविला. बीडकर आणि राठी यांनी महापालिका अधिकारी आणि प्रभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधून बेकायदा टेकडीफोड रोखण्याबाबत सांगितले. ही माहिती मिळाल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन पाहणी केली आणि टेकडी फोडण्याचे काम तातडीने थांबवले. या प्रकाराबाबत महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांना संस्थेतर्फे लगेचच पत्रही देण्यात आले.

Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
Versova Koliwada, facilities Versova koliwada,
वर्सोवा कोळीवाड्याला सोयी-सुविधांची प्रतीक्षा
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
uran marathi news, uran farmers marathi news, mangroves uran marathi news
उरणच्या शेती, मिठागरांत समुद्राचे पाणी; खारफुटीमुळे शेतकऱ्यांवर जमिनींचा मालकी हक्क गमावण्याची वेळ