News Flash

घरपोच मद्यविक्री ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे नाही

ई- कॉमर्स कंपन्यांद्वारे नागरिकांना  मद्य घरपोच मिळणार नाही.

घरपोच मद्यविक्री ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे नाही

दुकाने किंवा मद्यालयांशी संपर्क साधण्याचे ग्राहकांना आवाहन

पुणे : संचारबंदी काळात ग्राहकांना ई-कॉमर्स कं पन्यांद्वारे वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या कं पन्यांकडून ऑनलाइन मद्य मिळणार नाही. त्यामुळे मद्य ग्राहकांना घराजवळची मद्यविक्री दुकाने किं वा मद्यालयांचे संपर्क क्रमांक मिळवून दुकानदार किं वा मद्यालयामधून सुविधा घ्यावी लागणार आहे. दरम्यान, महापालिके कडून बिअर शॉपी, वाइन शॉपी आणि मद्यालयांमधून मद्य देण्यास परवानगी देण्याबाबत स्वतंत्र आदेश प्रसृत करण्यात येणार आहेत.

करोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने बुधवारी (१४ एप्रिल) रात्री आठ वाजल्यापासून १ मे रोजी सकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदी लागू के ली आहे. या काळात हॉटेल, रेस्टॉरंट, मद्यालये आणि मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्यात आली असून या ठिकाणाहून के वळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. गेल्या वर्षी टाळेबंदी लागू करण्याची घोषणा झाल्यानंतर मद्यविक्रीच्या दुकानांसमोर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे यंदा संचारबंदी लागू करताना मद्यविक्रीची दुकाने बंद करण्यात आली. त्याऐवजी घरपोच पार्सल देण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-कॉमर्सद्वारे स्विगी, झोमॅटो किं वा अन्य कं पन्यांना अत्यावश्यक वस्तूंचे पार्सल पुरवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, मद्याचे पार्सल या कं पन्यांकडून दिले जाणार नाही, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरुवारी स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मद्य ग्राहकांना आंतरमहाजाल सुविधेवरून मद्यविक्री दुकाने आणि त्यांचे संपर्क क्रमांक मिळवून मद्य खरेदी करावी लागणार आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाचे अधीक्षक संतोष झगडे म्हणाले, ‘मद्याचा पुरवठा  ऑनलाइन करण्याची तरतूद कायद्यामध्ये नाही. त्यामुळे ई- कॉमर्स कंपन्यांद्वारे नागरिकांना  मद्य घरपोच मिळणार नाही.

मद्यविक्री दुकानदार किं वा मद्यालयामधून मद्य खरेदी करता येणार आहे. त्यासाठी संबंधित दुकानदार किं वा मद्यालयांचे संपर्क क्रमांक नागरिकांना मिळवावे लागतील. त्यांच्याशी संपर्क साधून मद्य खरेदी करण्याची सुविधा आहे.’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:00 am

Web Title: home grown liquor is not sold by e commerce companies akp 94
Next Stories
1 करोना उपाययोजनांसाठी आमदारांच्या निधीतून १ कोटी खर्च होणार!
2 धक्कादायक : पुण्यातील ससून रुग्णालयात एका बेडवर दोघांवर उपचार सुरू
3 “करोनाविरुद्धच्या लढाईत कुचराई चालणार नाही”; अजित पवारांच्या बैठकीत सूचना
Just Now!
X