27 February 2021

News Flash

धक्कादायक! पिंपरीत अशी सुरु होती घरगुती गॅसची चोरी, ३८१ सिलिंडर जप्त

25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला सामाजिक सुरक्षा पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी एकूण 22 जणांना ताब्यात घेण्यात आलं असून ही कारवाई आज सांगवी परिसरात करण्यात आली आहे.
कारवाईमध्ये एकूण 381 गॅसच्या रिकाम्या आणि भरलेल्या टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. संबंधित आरोपी हे भैरवनाथ गॅस एजन्सी आणि कांकरिया गॅस एजन्सीमधील कर्मचारी असल्याचं समोर आलं असून 25 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वरिष्ठ विठ्ठल कुबडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी परिसरातून घरगुती गॅसची चोरी करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्याकडून तब्बल 381 घरगुती गॅस हस्तगत करण्यात आले आहेत. मुख्य गोडाऊनमधून इतर दुसऱ्या गोडाऊनमध्ये गॅस सिलेंडर नेऊन तिथे कनेक्टरच्या सहाय्याने एका सिलिंडरमधून एक ते दोन किलो गॅस दुसऱ्या रिकाम्या सिलेंडरमध्ये भरायचे.”

पुन्हा, ते गॅस ग्राहकांना विकायचे. हे सर्व सांगवी परिसरातील भैरवनाथ गॅस आणि कांकरिया गॅस एजन्सी मधील कर्मचारी आहेत. त्याच्याकडून 14 टेम्पोमध्ये 381 गॅस च्या भरलेल्या आणि रिकाम्या टाक्या सामाजिक सुरक्षा पथकाने ताब्यात घेतल्या आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सिसोदे, सोळंखे, पोलीस कर्मचारी कांबळे, बारकुले, करोटे, शिरसाठ, भारती, तिडके, लोंढे, असवले, मुठे, महिला पोलीस कर्मचारी जाधव, माने आणि गावडे, कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2021 1:51 pm

Web Title: home lpg gas cylinder stealing racket bursted in pimpri kjp 91 dmp 82
Next Stories
1 पुणे : सणसवाडीत फायबर मोल्डिंग कंपनीला भीषण आग, अग्निशमनच्या आठ गाड्या घटनास्थळी
2 नरेंद्र मोदीनींच अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं; चंद्रकांत पाटलाचं अजब विधान
3 रविवारी राज्यावरील पावसाळी सावट दूर!
Just Now!
X