News Flash

संजय दत्तच्या ‘पॅरोल’ची चौकशी करण्याचा गृहमंत्र्याचा आदेश

मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर सुटका करण्याच्या आदेशाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत.

| December 7, 2013 03:34 am

 मुंबई बॉम्बस्फोटप्रकरणी शिक्षा भोगत असलेल्या अभिनेता संजय दत्तची पॅरोलवर सुटका करण्याच्या आदेशाची चौकशी करण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिले आहेत. पॅरोलचा आदेश महसूल विभागाकडून काढला जातो.
पुण्यातील विभागीय आयुक्तांनी संजय दत्तला महिन्याभरासाठी पॅरोल मंजूर केला आहे. मात्र संजय दत्त खोट बोलत असूनही, त्याला पॅरोल मंजूर झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. संजयने पत्नी मान्यताच्या आजारपणाचे कारण पुढे केल्याने त्याला महिन्याभरासाठी पॅरोल मंजूर झाला आहे. मात्र दोन दिवसापूर्वीच मान्यता ‘र..राजकुमार’ चित्रपटाच्या प्रिमियरला हजर होती. यावेळी तिच्याकडे पाहून ती आजारी असल्याचे अजिबात वाटले नाही. ती ठणठणीत दिसत होती. माध्यमांमध्ये प्रिमियरला हजर असलेल्या मान्यताची छायाचित्रे झळकल्यानंतरही संजयला पॅरोल मंजूर झाल्याने तुरुंग प्रशासनाच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे.
मुंबईत १९९३साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी संजय दत्तला पाचवर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. ऑक्टोंबर महिन्यात संजय दत्त स्वत:च्या आजारपणाचे कारण देऊन २८ दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आला होता. दोन महिन्यात दुस-यांदा संजयला पॅरोल मंजूर झाल्याने संजय शिक्षेचा कालावधी पूर्ण करणार का ? अशा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे तसेच संजयला वारंवार पॅरोल मंजूर झाल्याने सर्वसामान्यांमध्येही कायद्याबद्दल एका चूकीचा संदेश जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2013 3:34 am

Web Title: home ministers order for sanjay dutts parrols inquiry
टॅग : R R Patil,Sanjay Dutt
Next Stories
1 अनधिकृत बांधकामाचे विधेयक ठरवणार राष्ट्रवादीचे ‘भवितव्य’
2 जगभरातील २०० रेडिओ अ‍ॅस्ट्रॉनॉमर पुण्यात जमणार!
3 शिक्षण मंडळाकडून गुणवंतांना अद्यापही शिष्यवृत्तीचे वितरण नाही
Just Now!
X