News Flash

रुग्णालयातील महिला कर्मचारी दीड तास लिफ्टमध्ये अडकल्या

क्षमता सात व्यक्तींची असताना त्यात तेरा महिलांनी प्रवेश केला होता.

(संग्रहित छायाचित्र)

अग्निशमन दलाकडून सुटका; प्राणवायूचा पुरवठा केल्याने अनर्थ टळला

पुणे : हडपसर भागातील मगरपट्टा सिटी परिसरात असलेल्या अ‍ॅनेक्स हॉस्पिटलमधील लिफ्टमध्ये क्षमतेपेक्षा जास्त व्यक्ती बसल्याने यंत्रणेत बिघाड झाला. त्यामुळे लिफ्टमध्ये रुग्णालयातील १३ महिला कर्मचारी तब्बल दीड तास अडकल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन महिला कर्मचाऱ्यांची सुटका केली तसेच लिफ्टमध्ये अडकलेल्यांना प्राणवायूचा पुरवठा केल्याने अनर्थ टळला.

हडपसर भागातील मगरपट्टा भागात अ‍ॅनेक्स हॉस्पिटल आहे. सकाळी आठच्या सुमारास रुग्णालयातील लिफ्टमध्ये तेरा महिला कर्मचारी अडकल्याची माहिती अग्निशमन दलाच्या हडपसर केंद्राला मिळाली. क्षमता सात व्यक्तींची असताना त्यात तेरा महिलांनी प्रवेश केला होता. त्यामुळे यंत्रणेत बिघाड झाला.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन अडकलेल्या महिला कर्मचाऱ्यांना नलिकेद्वारे प्राणवायूचा पुरवठा केला. या घटनेमुळे महिला कर्मचारी घाबरल्या होत्या. त्यानंतर तंत्रज्ञांना घटनास्थळी बोलविण्यात आले.

यंत्रातील बिघाड दूर केल्यानंतर पहिल्या मजल्यावरून तळमजल्यावर येत असलेल्या लिफ्टमधून अडकलेल्या महिला कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली. अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख शिवाजी चव्हाण, प्रमोद सोनवणे, अनिल गायकवाड, सुभाष खाडे, सागर दळवी, नीलेश वानखेडे यांनी तत्परता दाखविल्यामुळे अनर्थ टळला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2020 2:55 am

Web Title: hospital female staff got stuck in the elevator zws 70
Next Stories
1 सिंहगडावर धोकादायक ठिकाणी संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम पूर्ण
2 हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारून सरत्या वर्षांला निरोप
3 ‘मुलांना समजून घेताना’
Just Now!
X