पुणे : संचारबंदीमुळे शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने कार्यरत असताना आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने ऑनलाइन शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत पढे ऑनलाइन ही मोहीम सुरू के ली आहे. भारतातील ऑनलाइन शिक्षणाचा प्रचार, प्रसार, वापर कशा पद्धतीने वाढवता येईल, याबाबतच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी देशात अभूतपूर्व अशी संचारबंदी लागू करण्यात आली. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या. शैक्षणिक कामकाज थांबले. मात्र, त्यावर पर्याय म्हणून ऑनलाइन पद्धतीने अध्यापन-अध्ययन सुरू झाले. झूम, गुगल क्लासरूम, स्काईप अशी विविध व्यासपीठे वापर शिक्षण प्रक्रिया नियमित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, अडचणीतून निर्माण झालेला ऑनलाइन शिक्षणाचा प्रयोग आता सातत्याने आणि कायमस्वरूपी राबवण्याची के ंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची कल्पना आहे. त्यासाठी भारत पढे ऑनलाइन मोहीम हाती घेतली आहे.  शिक्षण क्षेत्रातील घटकांकडून त्यांच्या कल्पना, सूचना १६ एप्रिलपर्यंत मागवण्यात आल्या आहेत. या सूचना, कल्पना tbharatpadheonline.mhrd@gmail.com. या ईमेलवर पाठवता येतील, असे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डी. पी. सिंग यांनी स्पष्ट के ले.