29 October 2020

News Flash

बारावी निकाल : कोकण अव्वल, नाशिक, मुंबई तळात

राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के इतका आहे.

| May 27, 2015 12:08 pm

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी सकाळी जाहीर करण्यात आला. यंदा निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून, या विभागाचा निकाल सर्वाधिक ९५.६८ टक्के इतका लागला आहे. दुसरीकडे नाशिक विभागाचा निकाल सर्वांत कमी ८८.१३ टक्के इतका लागला आहे. मुंबई विभागाचा निकालही इतरांच्या तुलनेत कमी म्हणजे ९०.११ टक्के इतकाच लागला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.२६ टक्के इतका आहे.
नेहमीप्रमाणे यंदाही निकालामध्ये मुलींनी मुलांना मागे टाकले आहे. एकूण उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींची टक्केवारी ९४.२९ इतकी असून, विद्यार्थ्यांची टक्केवारी ८८.८० इतकी आहे.
विभागनिहाय निकालाची टक्केवारी खालीलप्रमाणे…
नागपूर – ९२.११
कोल्हापूर – ९२.१३
औरंगाबाद – ९१.७७
नाशिक – ८८.१३
पुणे – ९१.९६
कोकण – ९५.६८
लातूर – ९१.९३
मुंबई – ९०.११
अमरावती – ९२.५०
एकूण – ९१.२६
शाखांनुसार टक्केवारी पुढीलप्रमाणे…
विज्ञान – ९५.७२
वाणिज्य – ९१.६०
कला – ८६.३१
एमसीव्हीसी – ८९.३०
विद्यार्थ्यांना गुणपत्रकांचे वाटप ४ जूनला दुपारी ३ वाजता करण्यात येणार आहे. या वर्षी राज्यातून या परीक्षेसाठी साधारण १३ लाख ३९ हजार २०२ विद्यार्थी बसले होते. राज्यातील २ हजार ३८९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना एक वाजल्यापासून मंडळाच्या खालील संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील.
www.mahresult.nic.in
www.maharashtraeducation.com
www.hscresult.mkcl.org
www.rediff.com/exams

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 27, 2015 12:08 pm

Web Title: hsc results 2015 declared
Next Stories
1 शालेय वाहतूक सुरक्षा मोहिमेचा उत्साह ओसरला?
2 पुण्यात हायप्रोफाईल वेश्या व्यवसाय तेजीत!
3 ‘पुणे मेट्रो’बाबत कालबद्ध आश्वासन देता येणार नाही – केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू
Just Now!
X