10 August 2020

News Flash

पुण्यातील बांधकामांमध्ये गुन्हेगारांची मोठी गुंतवणूक

राज्यात मुंबईनंतर पुणे हे सर्वात मोठे व जवळचे शहर आहे. त्यामुळे गुन्हेगारी विश्वातील लोकांकडून पुण्याच्या बांधकामांमध्ये (रिअल इस्टेट) मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.

| August 21, 2013 02:39 am

राज्यात मुंबईनंतर पुणे हे सर्वात मोठे शहर असून, या दोन्ही ठिकाणांमध्ये अंतर कमी आहे. त्यामुळे गुन्हेगारी विश्वातील लोकांकडून पुण्याच्या बांधकामांमध्ये (रिअल इस्टेट) मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे. त्याची सर्व सूत्रे मुंबईमध्ये आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार एस. हुसेन झैदी यांनी बुधवारी दिली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘मुंबई अंडरवर्ल्ड : आज आणि उद्या’ या विषयावर त्यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी पत्रकार संघाचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी, सरचिटणीस राजेंद्र पाटील हे उपस्थित होते. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना झैदी यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली.  मुंबई अंडरवर्ल्ड संपले असून कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा कराचीत राहण्यास आहे. तो त्या ठिकाणीच राहील व त्या ठिकाणीच मरेल, असेही झैदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2013 2:39 am

Web Title: huge investment by underworld in pune real estate
Next Stories
1 काँग्रेसला गृहीत धरून राष्ट्रवादीचा कारभार – ठाकरे
2 राष्ट्रवादीवर विश्वास ठेवू नका – नारायण राणे
3 चार तिकीट तपासनिसांना देहूरोड येथे ट्रकने ठोकरले
Just Now!
X