22 September 2020

News Flash

पवना नदीवरील केजुबाई धरण भागात शेकडो मासे आढळले मृतावस्थेत

जलपर्णी काढत असताना लक्षात आली बाब

पिंपरी-चिंचवडच्या पवना नदीवर असलेल्या केजुबाई धरण भागात शेकडो मासे मृतावस्थेत आढळले आहेत. अडीच किलोमीटरच्या परिसरात तब्बल ८ नाले असल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली आहे. ८ पैकी एका नाल्यातून रसायन मिश्रित पाणी येत असल्याचा संशय व्यक्त केला असून त्याचमुळे मासे मरत असल्याचं सांगण्यात येत आहे.गेल्या दोन दिवसांपासून इथे मृत मासे पहावयास मिळत आहे. या आधी असे प्रकार पहण्यास मिळालेले नाही. मृत झालेले इतर अनेक मासे जलपर्णीखाली आहेत. त्यामुळे मृत मासे मोठ्या प्रमाणावर आहेत अशीही शक्यता आहे.

सचिन काळभोर हे रोटरीचे सदस्य असून ते लोकसहभागातून जलपर्णी काढण्याचं काम गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. सोमवारी पवना नदी, केजुबाई धरण येथे जलपर्णी काढत असताना अनेक मासे मृत अवस्थेत आढळल्याचे त्यांनी सांगितले आहे. पवना नदीच्या प्रवाहात ८ नाले हे नदीमध्ये सोडले गेले आहेत.त्यामधील एका नाल्यातून रासायनिक पाणी येत असल्याने मासे मृत झाल्याचे सांगण्यात येत आहे. आता महापालिका यामध्ये काय उपाय करणार ? हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 4:24 pm

Web Title: hundreds of fish were found dead in kejubai dam area on pawana river
Next Stories
1 हडपसरमध्ये पाच वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; ४० वर्षीय आरोपी गजाआड
2 मुलाची आत्महत्या, धक्क्याने आईचाही मृत्यू; पिंपरीतील कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
3 पुण्यात किरकोळ वादातून मित्राची हत्या
Just Now!
X