03 June 2020

News Flash

चिंचवडला निर्बंध झुगारून शेकडो रहिवासी रस्त्यावर

काही काळ तणाव, आयुक्त-आमदारांच्या भेटीनंतर वातावरण निवळले

चिंचवडच्या आनंदनगर भागातील रहिवासी बुधवारी र्निबध झुगारून रस्त्यावर आल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

काही काळ तणाव, आयुक्त-आमदारांच्या भेटीनंतर वातावरण निवळले

पिंपरी: करोनाचा मोठय़ा प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या चिंचवडच्या आनंदनगर भागातील रहिवासी बुधवारी (२० मे) सर्व निर्बंध झुगारून थेट रस्त्यावर उतरल्याने बराच गोंधळ उडाला. काही दिवसांपासून खाण्यापिण्याचे हाल होत असल्याने नागरिकांचा संयम सुटल्याने ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. तथापि, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांनी नागरिकांची समजूत काढल्याने पुढील प्रकार टळला आणि वातावरण निवळले.

गेल्या काही दिवसांपासून आनंदनगरमध्ये करोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे येथील निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे खाण्यापिण्याचे हाल होऊ लागल्याची तक्रार नागरिक करत होते. करोनामुळे येथील नागरिकांना कामावर घेतले जाणार नाही, असा गैरसमजही पसरला होता. याच कारणास्तव बुधवारी शेकडो नागरिक अचानक रस्त्यावर उतरल्याने गोंधळ उडाला. नागरिकांनी पालिकेच्या कारभारावर तसेच पोलिसांच्या जाचक निर्बंधांवर तीव्र आक्षेप घेत मोर्चा काढला. पोलिसांनी त्यांना अडवले आणि समजून सांगितले, तरीही गोंधळ सुरूच होता. गर्दी तसेच गोंधळ वाढल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर, आमदार अण्णा बनसोडे, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी घटनास्थळी भेट दिली. नागरिकांची गैरसोय होणार नाही, भाजीपाला, दूध, औषधे आदी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जाईल. कोणत्याही घरकाम करणाऱ्या कामगारांचा रोजगार जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. त्यानंतर वातावरण निवळले. या वेळी नगरसेवक शीतल शिंदे, शैलेश मोरे, प्रसाद शेट्टी, डॉ. पवन साळवे उपस्थित होते.

काही दिवसांपासून नागरिकांचे हाल होत होते. अलीकडे येथील निर्बंध कठोर करण्यात आले होते. तसेच, बरेचसे गैरसमज निर्माण झाले होते. त्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. मात्र, आयुक्त श्रावण हर्डीकर, आमदार अण्णा बनसोडे यांनी आनंदनगरमध्ये येऊन नागरिकांची समजूत काढली.

– प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक, चिंचवड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2020 12:43 am

Web Title: hundreds of residents 0n streets in chinchwad despite restrictions zws 70
Next Stories
1 ढगाळ स्थितीमुळे तापमानात चढ-उतार
2 अंतिम वर्षांची परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान
3 रेल्वेगाडी सुटण्यापूर्वीच ऐवज मिळाला..
Just Now!
X