News Flash

पतीचा पत्नीवर चाकू हल्ला; थरारक व्हिडीओ व्हायरल

नागरिकांडून मोबाईलमध्ये चित्रण

पिंपरी-चिंचवडमध्ये पतीने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून चाकू हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केला. या प्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिरोज अली शेख (वय ३०) आणि फरहान शेख (वय २६) हे पती-पत्नी पिंपरी-चिंचवडमधील अजमेर वसाहतीत राहतात. काल ५ ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बाहेर फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने फिरोजने पत्नीला मोशी येथील मोकळ्या मैदानात नेले आणि तिच्यावर चाकूने हल्ला चढवला. मात्र, पत्नीने आरडाओरडा केल्याने मैदानाशेजारील नागरिकांनी धाव घेतली. दरम्यान, फिरोजने फरहानच्या गळ्याला चाकू लावला होता. तसेच तिच्या पोटातही चाकूने हल्ला केला. हा सर्व प्रकार बघ्याची भुमिका घेणाऱ्या नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, वेळीच नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी फरहानवर ताबा मिळवला.

या घटनेमुळे पत्नी घाबरलेली होती. फरहान याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा हल्ला चारित्र्याच्या संशयावरून केला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मात्र या घटनेचा विडिओ सोशियल मीडियावर व्हायरल झाला आहे. फरहान आणि फिरोज यांना तीन मुले असून त्यांचा विवाह हा दहा वर्षांपूर्वी झाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2017 6:09 pm

Web Title: husband attack on wife with knife at pimpari chinchawad video viral
Next Stories
1 आंबोलीत दरीत पडलेल्या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश
2 ‘आमचा कोणताही पदाधिकारी बावळट नाहीये’; खासदार काकडेंना ‘पुणेरी’ भाषेत उत्तर
3 पुण्यात ‘मराठा क्रांती मोर्चा’च्या दुचाकी रॅलीला सुरुवात
Just Now!
X