News Flash

चारित्र्याच्या संशयातून पतीचा पत्नीवर हल्ला

योगेश याने चाकूने केलेल्या हल्ल्यात आयुष बसेरे या सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला.

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील लोणी काळभोर येथे चारित्र्याच्या संशयावरून एकाने पत्नीसह सहा वर्षीय मुलगा आणि मेहुण्यावर चाकूने वार केल्याची घटना घडली. त्यानंतर त्याने स्वतःवरही वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात सहा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात खळबळ उडाली असून लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहे.

आरोपी योगेश बसेरे, पत्नी गौरी बसेरे, मेहुणा भारत उत्तम शिरोळे हे तिघे जण जखमी झाले आहेत. योगेश याने चाकूने केलेल्या हल्ल्यात आयुष बसेरे या सहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर परिसरातील पठारे वस्ती येथे गौरी बसेरे यांचे पती सोबत भांडण झाल्याने भावाकडे राहण्यास आल्या होत्या. गुरुवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास योगेश हा पत्नीला भेटण्यास आला. त्यानंतर काही वेळाने दोघांमध्ये भांडण झाले. त्याच वेळी आरोपी योगेश याने त्याच्या जवळ असणार्‍या चाकूने पत्नीवर वार करण्यास सुरुवात केली. तो आवाज ऐकून गौरी यांचा भाऊ हा भांडण सोडविण्यासाठी गेल्यावर त्याच्यावर देखील त्याने वार करण्यात आले. तेव्हा बाजूला असणार्‍या आयुष या सहा वर्षाच्या मुलावर देखील त्याने वार केले. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाल्याची झाला.

या घटनेनंतर आरोपी योगेश याने स्वतःवरही वार केले. या सर्व प्रकारानंतर तिनही जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच योगेश हा आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सतत भांडणे होत होती. यामधून ही घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2019 10:43 am

Web Title: husband attacks character suspicion wife three injured one dead pune jud 87
Next Stories
1 मोसमी पावसाला दोन दिवसांचा विलंब
2 रक्तसंकलनाबाबत देशात महाराष्ट्र स्वयंपूर्ण
3 अकरावी प्रवेशासाठी यंदा जागा वाढणार
Just Now!
X