News Flash

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

कौटुंबिक वाद तसेच संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बिबवेवाडी भागात घडली.

प्रातिनिधिक छायाचित्र

कौटुंबिक वाद तसेच संशयावरून खून

कौटुंबिक वाद तसेच संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना बिबवेवाडी भागात राजीव गांधीनगर भागात रविवारी घडली. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सारिका रामदास चालेकर (वय ३०, रा. राजीव गांधीनगर, बिबवेवाडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सारिकाचा खून ेकेल्यानंतर तिचा पती रामदास (वय ३७) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास आणि सारिका खासगी रुग्णालयात कामाला आहेत. त्यांना रोहित (वय १५) आणि ऋतिक (वय १७)  मुले आहेत. रोहित सध्या दहावीची परीक्षा बहिस्थ पद्धतीने देत आहे. ऋतिक कबड्डीपटू आहे. तो सध्या सदाशिव पेठेत राहायला आहे. गेल्या काही दिवसांपासून रामदास पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिला त्रास देत होता. या कारणावरून त्यांच्यात भांडणे व्हायची. रोहित वृत्तपत्र वितरकाकडे कामाला आहे. शनिवारी रात्री रोहित, त्याची आई सारिका आणि वडील रामदास घरात होते. रामदास आणि सारिका यांच्यात रात्री वाद झाला. त्यानंतर सारिकाची आई रात्री घरी आली आणि तिने मध्यस्थी केली. रात्री रोहित आणि त्याची आई सारिका पोटमाळ्यावर झोपले.

पहाटे साडेचारच्या सुमारास रोहित वृत्तपत्र वितरणाच्या कामासाठी घरातून बाहेर पडला. पहाटे गाढ झोपेत असलेल्या सारिकाचा रामदासने गळा दाबून खून केला. त्यानंतर पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. सकाळी साडेआठच्या सुमारास रोहित घरी आला. तेव्हा वडील रामदास यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. पोटमाळ्यावर आई सारिका बेशुद्धावस्थेत पडल्याचे त्याने पाहिले. त्यानंतर त्याने तातडीने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच दोघे मरण पावले होते. बिबवेवाडी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:19 am

Web Title: husband commit suicide after killing his wife due to family dispute
Next Stories
1 मेट्रो स्टेशनसाठी जागा देण्यास पुणे महानगरपालिकेची तयारी
2 ‘लोकसत्ता’च्या वार्ताहराला मारहाण
3 पुण्यातील महिलांनी तयार केलेल्या गोधडीला परदेशात पसंती
Just Now!
X