News Flash

पोहे का केले? पुण्यात नवऱ्याला बायकोनं बदडले

पोहे केल्याच्या रागातून पत्नी आणि मुलाने पतीला कढई आणि बेल्टने बेदम मारहाण केली.

पोहे का केले? या रागातून पत्नीने पतीला बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. चिखलीजवळील मोरेवस्ती येथे गुरूवारी सांयकाळी सात वाजता ही घटना घडली आहे. ४९ वर्षीय जालिंदर लक्ष्मण सरवदे यांनी या प्रकरणी आठ फेब्रुवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रतिभा सरवदे (वय ३६) आणि मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वयंपाकघरात पतीने पोहे केल्याच्या रागातून पत्नी आणि मुलाने पतीला कढई आणि बेल्टने बेदम मारहाण केली. गुरूवारी,  सांयकाळी जोराची भूक लागल्यमुळे सरवदे यांनी मुलाला पोहे आणायला सांगितले. पोहे आणून दिल्यानंतर सरवदे स्वयंपाकघरात पोहे करीत होते. दरम्यान त्यांची पत्नी घरी आली. नवऱ्याला स्वयंपाकघरात काम करताना पाहिल्यानंतर प्रतिभा यांचा पारा चढला. चिडलेल्या प्रतिभा आणि जालिंदर या पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. प्रतिभा यांनी स्वंयपाक घरातील कढईने मारहाण केली. त्यानंतर पत्नीने मुलालाही पतीला मारायला सांगितले. मुलाने बेल्टनं मारहाण केली. यामध्ये जालिंदर यांना दुखापत झाली आहे. मारहाणीनंतर दोघांनी जालिंदर यांना जिवे मारण्याची धमकीही दिली.

या सर्व प्रकारानंतर जालिंदर यांनी जवळील चिखली पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. या प्रकरणाचा सर्व तपास चिखली पोलीस करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 2:27 pm

Web Title: husband got beaten up by wife and son nck 90
Next Stories
1 Teddy Day: पुणे पोलिस म्हणतायत कुठेही टेडी बेअर दिसला तर आम्हाला कळवा…
2 बहिणीला त्रास देणाऱ्या पतीची मेहुण्याने केली हत्या
3 जनतेचा आशीर्वाद असल्यास पुन्हा येऊच -देवेंद्र फडणवीस
Just Now!
X