24 January 2021

News Flash

धक्कादायक : दारूसाठी पैसे दिले नाही म्हणून पतीने केली पत्नीची हत्या

पुण्यातील हडपसर परिसरात घडला धक्कादायक प्रकार

(संग्रहित छायाचित्र)

पुण्यातील हडपसर येथे दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीनं पत्नीच्या डोक्यात तवा मारून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कला आदिनारायण यादव (३०) असे या महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर आदिनारायण कंटू यादव या आरोपीस अटक करण्यात आली आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती आदिनारायण कंटू यादव आणि पत्नी कला हे दोघे केशवनगर येथे मागील अनेक वर्षापासुन राहत होते. त्या दोघांमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरून सतत वाद होत असत. परंतु गुरूवारी दुपारच्या सुमारास आदिनारायण याने पत्नी कलाकडे दारूसाठी पैसे मागितले. तेव्हा तिने पैसे देण्यास नकार दिला. त्यावेळी चुलीवर असलेला, तवा त्याने पत्नीच्या डोक्यात घातला.

यामध्ये पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यानंतर तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी पती आदिनारायण कंटू यादव याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आल्याचंही पोलिसांनी सांगितलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2020 9:38 pm

Web Title: husband killed her wife she did not give money for liquor jud 87
Next Stories
1 हजारो विद्यार्थ्यांच्या तक्रारींनंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ३ डिसेंबरला लावणार फेरनिकाल
2 पुणे : मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले अवाढव्य हाडांचे अवशेष
3 पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शनिवारी पुण्यातील सिरम इन्स्टीट्यूटला देणार भेट
Just Now!
X