News Flash

धक्कादायक! पुण्यातील माजी नगरसेविकेच्या पतीची गळफास घेऊन आत्महत्या

राजकीय वर्तुळात खळबळ

प्रातिनिधिक

पुण्यात माजी नगरसेविकेच्या पतीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जयंत राजपूत असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. जयंत राजपूत हे नीता परदेशी राजपूत यांचे पती आहेत. नीता परदेशी राजपूत पुणे महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्षपदी होत्या. तसंच काँग्रेस पक्षाच्या नेत्या म्हणूनही काम केलं आहे. जयंत राजपूत यांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयंत राजपूत हे व्यावसायिक असून त्यांचे लॉ कॉलेज रोड येथे ऑफिस आहे. तिथेच जयंत रजपूत यांनी रात्रीच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलगा कार्यालयात गेल्यावर ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचं कारण अद्यापपर्यंत समजू शकलेलं नाही. डेक्कन पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2020 12:54 pm

Web Title: husband of ex corporator commit suicide in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 बाणेर कचरा प्रकल्प हटविण्याचे आदेश
2 पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्यांदा करोना
3 निवृत्तीच्या उंबरठय़ावर फौजदार, पण बदलीमुळे बेजार!
Just Now!
X