News Flash

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर वार करून पतीची आत्महत्या

पंधराव्या मजल्यावरून मारली उडी

(संग्रहित छायाचित्र)

चारित्र्याच्या संशयावरून पुण्यातील हडपसर येथे पती आणि पत्नीमध्ये भांडण झाली. त्यानंतर पतीने पत्नीवर वार करून स्वतः पंधराव्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली.

सुभाषचंद्र अग्रवाल वय ६५ असे आत्महत्या केलेल्या व्यक्तिचे नाव आहे. तर,  जखमी झालेल्या पत्नीचे नाव रेखा अग्रवाल असे आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार,महंमदवाडी परिसरातील पेबल पार्क सोसायटीमध्ये १५ व्या मजल्यावर राहणारे सुभाषचंद्र अग्रवाल आणि त्यांच्या पत्नी रेखा यांच्यामध्ये सतत भांडणे होत असत. आज देखील त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. यावेळी संतप्त झालेल्या सुभाषचंद्र यांनी पत्नी रेखा यांच्यावर चाकुने वार केले. यामुळे रेखा ह्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. त्यानंतर सुभाषचंद्र यांनी त्यांच्या घराच्या गॅलरीमधुन उडी मारून आत्महत्या केली.  या घटनेत सुभाषचंद्र यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी रेखा यांना स्थानिक रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2019 3:01 pm

Web Title: husbands suicide after attack on wife msr87
Next Stories
1 बहिणीकडे पाहणाऱ्यास जाब विचारणार्‍या तरुणाचा खून
2 लोणावळा-पुणे लोकलला रोजचा उशीर, संतापलेल्या प्रवाशांचा रेल रोको
3 पुण्यात पालख्यांच्या बंदोबस्तासाठी चाललेल्या पोलिसाचा अपघाती मृत्यू
Just Now!
X