हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहे. काहीजणांनी पोलिसांच्या कारवाईचं कौतुक केलं आहे तर काहींनी चकमक करण्याची पद्धत चुकीची असल्याचं म्हटलं आहे. याप्रकरणातील आरोपी हे खरे होते की नाही, हे न्याय पद्धतीने सिद्ध झाले नसल्याने याबाबत शंकेला जागा निर्माण होते. त्यामुळे प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, असे मत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले होते.

‘या एन्काऊंटरमुळे पोलिसांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना असा एन्काऊंटर कसा होतो. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर शंका येते. ज्यांनी वेळीच कारवाई केली नाही, तक्रार नोंदवून घेतली नाही अशा सगळ्यांवर कारवाई होऊ शकते. म्हणूनच यावर पडदा टाकण्यासाठी केलेला हा प्रयत्न असू शकतो. हे एन्काऊंटर केले कि घडवले याची केंद्राने चौकशी करायला हवी. जे घडलं त्यावर पडदा टाकण्यासाठी हे केलं गेलं आहे का?,’ असा सवाल विचारत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

हैदराबादमधील 26 वर्षीय डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन तिला जाळण्याचे घृणास्पद कृत्य करणाऱ्या चारही आरोपींचा हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. मुळात आरोपींना म्रुत्युदंडाची शिक्षा मिळायला हवी होती परंतु बर्याच वेळा न्यायालयात निकाल लागण्यास विलंब लागतो.ज्योतीकुमारी चौधरीच्या केसमध्ये तर सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा देऊनही त्याची अंमलबजावणी झाली नाही म्हणुन आरोपींना जामीन देण्यात आला.या आरोपींच्या एनकाऊंटरबाबत विचार होत आहे.

हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस एन्काऊंटरमध्ये ठार झाले आहेत. घटनास्थळाची तपासणी करण्यासाठी त्यांना नेण्यात आले होते, तेव्हा पळून जाण्य़ाचा प्रयत्न करताना त्यांचा पोलिसांकडून खात्मा करण्यात आला आहे.