राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची आपली इच्छा आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी भाजपाही देशावरची आपत्ती आहे असा केला होता. त्याबाबत विचारलं असता, “शरद पवार यांची प्रतिक्रिया फारशी गांभीर्याने घेण्याची गरज नाही. कारण ते ५० वर्षे राजकारणात आहे तरीही त्यांचा पक्ष १० पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र राजकारणात ते कायम केंद्रबिंदू असतात. ते कसे काय? एकाचवेळी ते उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सोनिया गांधी यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांचे म्हणणे कसे काय पटवून देतात? हे प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणून मला त्यांच्यावर पीएचडी करायची आहे. असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विसंवाद
एल्गार परिषदेचा तपास एएनआयकडे गेल्याने, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख नाराज, 100 युनिट वीज मोफत देणार नितीन राऊत म्हणताच, उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्याच्या तिजोरीत पैसे कुठे आहेत. राज्य सरकार मधील मंत्र्याची नाराजी लक्षात घेता, या राज्यातील सरकार विसंवादाने भरले असून अंतर्विरोधामुळे पडेल. अशी शक्यता भाजपचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊन तीन महिन्याचा कालावधी झाला आहे. या सरकारच्या कामावर समाधानी आहात का त्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मागील अनेक वर्षांपासून ओळखत असून त्यांचा स्वभाव मला माहित आहे. त्यांना विरोध पत्करण्याची सवय नाही. त्यामुळे एक क्षण असा येईल की, त्यावर उद्धव ठाकरे निश्चित प्रतिक्रिया देतील. एक वेळ सत्ता गेली, तरी चालेल अशी भूमिका घेतील अशी शक्यता आहे.  याकडे आम्ही आस लावून बसलेलो नाहीत. आता आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते म्हणून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले की, “देशात आणि राज्यात भाजपला एकट पाडण्याचं काम चालू आहे. ते आव्हान आमच्या समोर असून येणार्‍या सर्व निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार आहे. पुन्हा त्याच दिमाखात उभे राहू असाही निर्धार त्यांनी व्यक्त केला.

…..तोवर राज ठाकरेंसोबत एकत्र येऊ शकत नाही

केंद्र सरकारच्या नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ राज ठाकरे यांनी मोर्चा काढला आणि त्याआधी महाअधिवेशन घेऊन हिंदुत्वाची भूमिका त्यामुळे राज ठाकरे भाजप सोबत येतील का त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली.  आम्ही या भूमिकेचं स्वागत करतो. ज्या देश विरोधी ताकदी रस्त्यावर उतरून आझादी-आझादी म्हणून घोषणा देत होत्या. त्यावर आता नियंत्रण मिळण्यास मदत होईल. पण जोपर्यंत राज ठाकरे परप्रांतीयांबद्दलची भूमिका बदलू शकत नाही, तोवर आम्ही एकत्र काम करू शकत असंही पाटील यांनी म्हटलं आहे