सध्या माध्यामांवर मला भाजपाकडून ऑफर आली असल्याच्या चर्चा रंगत आहेत, मात्र ही जुनी बातमी आहे. पाच वर्षांपासून मला भाजपाकडून ऑफर आहे, याबाबत अनेक वेळा विधिमंडळात देखील भाजपच्या अनेक नेत्यांनी बोलून दाखवले आहे. मात्र मी शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. त्यांचाच आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. अंगात प्राण असेपर्यंत मी शरद पवारांना सोडून जाणार नाही. अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मांडली. भाजपाकडून तुम्हाला ऑफर असल्याची चर्चा आहे, या प्रश्नावर त्यांनी भूमिका व्यक्त केली. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी जयंत पाटील म्हणाले की, पक्ष अनेकांनी सोडला असले तरी आम्ही पक्ष पुन्हा उभा करू. गत आठ दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी भाजपाकडून जे राजकारण केले जात आहे. त्यामुळे भाजपाची प्रतिमा मलिन झाली आहे. शिवाय आता भाजपाची भ्रष्ट राजकीय पार्टी झाली असल्याचे सांगत त्यांनी भाजपाच्या कार्यपद्धतीवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, निवडून येण्याची क्षमता नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये आमच्यातील काहीजण जात आहेत. त्या सर्वांचा आम्हाला काही फरक पडता नाही. तसेच यंदा आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे ५० आमदार संपर्कात असल्याच्या विधानावर ते म्हणाले की, भाजपाचे मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीचे ५० आमदार संपर्कात असल्याचे विधान केले आहे, जर एवढे आमदार त्यांच्या संपर्कात असते. तर त्यांनी शिवसेनेला बाजूला करून स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असता.
पाहा व्हिडीओ