22 November 2019

News Flash

IND vs PAK : ऐकावं ते नवलच! पिंपरी-चिंचवडमधील विवाह सोहळ्यात ‘क्रिकेट फिव्हर’

लग्न सोहळ्याच्या ठिकाणी सामन्याचं थेट प्रक्षेपण

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण स्क्रिनच्या सहाय्याने चक्क विवाह सोहळ्यात करण्यात आले. पिंपरी-चिंचवड मधील एका मंगल कार्यालयात विवाह समारंभ पार पडला. पौर्णिमा उर्फ श्रद्धा राक्षे आणि अजिंक्य धावडे हे विवाह बंधनात अडकले. येणाऱ्या वऱ्हाडी मंडळींना आणि पाहुणे मंडळी यांना भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना बघता यावा, यासाठी सर्व सोय करण्यात आली होती.

या सामन्यात  भारताने प्रथम फलंदाजी करत ५ गाड्यांच्या मोबदल्यात ३३६ धावा केल्या. सध्या इंग्लंड मध्ये विश्वचषकाची स्पर्धा सुरू आहे. भारताने या अगोदर दोन सामने जिंकले असून एक पावसामुळे रद्द झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याची अवघ्या जगभरात उत्सुकता होती. पावसामुळे सामना होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह होते. मात्र, आज क्रिकेटचा सामना सुरू झाला.

आजच्या दिवशी म्हणजेच १६ जून रोजी पिंपरी-चिंचवडमधील राक्षे आणि धावडे यांचा विवाह समारंभ होता. त्यांनी सोशल मिडियाद्वारे विवाहच्या पत्रिका आपल्या परिजनांपर्यंत पोहचवल्या, पत्रिका छापल्या नसल्याने फेसबुक आणि व्हाट्सऍपची मदत घेत मित्रांना फोटो पोस्ट केले होते. पत्रिकेत विशेष टीप म्हणून भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल, असं नमूद केलं होतं. हे सर्व पाहता विवाह सोहळ्यास तब्बल तीन हजार पाहुणे मंडळी उपस्थित राहिली. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून विवाह सोहळ्यात मोठी अशी स्क्रिन लावण्यात आली. त्यावर भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आलं.

क्रिकेटचे भारतात अनेक चाहते आहेत. त्यात भारत पाकिस्तान सामना म्हटल्यानंतर अधिकच उत्सुकता असते. आज सायंकाळी पौर्णिमा उर्फ श्रद्धा राक्षे यांचा विवाह अजिंक्य धावडे यांच्या सोबत मोठ्या धुमधडाक्यात झाला. मात्र या विवाहासोबतच आजचा सामना भारताने जिंकला, तर त्यांच्या विवाह सोहळ्याची विशेष आठवण असेल हे मात्र नक्की.

First Published on June 16, 2019 10:02 pm

Web Title: icc world cup 2019 ind vs pak pimpri chinchwad marriage live streaming india pakistan cricket match vjb 91
Just Now!
X