News Flash

हेमंत करकरे असते तर तेव्हाच माझी सुटका झाली असती : समीर कुलकर्णी

मात्र, त्याचदरम्यान मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये हेमंत करकरे शहीद झाले, हे केवळ राष्ट्रासाठीच नव्हे तर माझ्यासारख्यासाठी मोठं दुर्देव ठरलं.

हेमंत करकरे असते तर तेव्हाच माझी सुटका झाली असती, असे विधान मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयीत आरोपी समीर कुलकर्णी यांनी केले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भुमिका मांडली. यावेळी युपीए सरकारवर हिंदूंना दहशतवादी ठरवल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान न करण्याचे आवाहन केले.

कुलकर्णी म्हणाले, मालेगाव स्फोटानंतर तत्कालीन दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांच्या पथकाने मला संशयीत म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर पाच दिवस माझ्यासह इतर संशयित आरोपींची कसून चौकशी करण्यात आली. तेव्हा हेमंत करकरे मला म्हणाले होते की, तुमचा या घटनेशी काहीही संबध नसल्याचे दिसत आहे. पण तुमच्याशी या घटनेतील कोणी संपर्कात आहेत का? याच्या चौकशीसाठी तुमची नार्को चाचणी करावी लागेल. जर दोषारोपपत्रात काही आढळून न आल्यास तुमची सुटका केली जाईल, असे करकरे यांनी अनामी रॉय यांच्यासमोर सांगितले होते. मात्र, त्याचदरम्यान मुंबईवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यामध्ये हेमंत करकरे शहीद झाले, हे केवळ राष्ट्रासाठीच नव्हे तर माझ्यासारख्यासाठी मोठं दुर्देव ठरलं.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर त्यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा उभा करुन कित्येक राष्ट्रभक्त कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबले, त्यांच्या विरोधात खोटे पुरावे तयार केले. मालेगाव प्रकरणात वर्षानुवर्षे खितपत पडल्यानंतर पाच आरोपी पुराव्याअभावी दोषमुक्त केले. हैद्राबाद येथील मक्का मशीद बॉम्बस्फोट आणि समझोता एक्सप्रेस बॉम्बस्फोटात आरोपींना निर्दोष ठरविताना न्यायालयाने तपास यंत्रणेवर ताशेरे मारले आहेत. त्यामुळे भारतीय समाजात धर्माच्या आधारे फूट पाडणाऱ्या या तत्कालीन सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करणे हे प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाचे कर्तव्य आहे. म्हणूनच सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी एकजुटीने या अभद्र आघाडीला सत्तेपासून दूर भिरकावून द्यावे, असे आवाहन कुलकर्णी यांनी यावेळी केले.

ते पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी हिंदू दहशतवादाचा उल्लेख अनेक वेळा करुन हिंदूंना बदनाम करण्याचा विडाच उचलला होता. त्यांनी सन १९९३ मधील मुंबईतील स्फोटातील दोषी याकूब मेमनचे वकील मजिद मेमन यांना राज्यसभेचे सभासदत्व देऊन देशाचा आणि हुतात्मा तुकाराम ओंबळेंचा अपमान केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2019 4:43 pm

Web Title: if hemant karkare live now then i would have been released says samir kulkarni
Next Stories
1 २० दिवसांच्या बाळावर काळाचा घाला, अपघातात वडिलांचाही मृत्यू
2 पिंपरीत तरुणाचा डोक्यात दगड घालून खून; आरोपीने मृतदेह जाळला
3 फेसबुकवरील ओळख पडली महागात; तरुणीने धमकी देत उकळले लाखो रुपये
Just Now!
X