सोलापूर येथून माझ्या राजकीय प्रवासाला सुरूवात झाली आहे. काँग्रेस पक्षाने सुरूवातीपासून अनेक पदांवर काम करण्याची मला संधी दिली आहे. त्या प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. मला काँग्रेस पक्षाने सगळं काही दिलं आहे. जर दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर मला काहीही मिळालं नसतं असं म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी  मला काँग्रेस पार्टीने सर्व काही दिले आहे, जर दुसर्‍या पक्षात गेलो असतो, तर काही मिळालं नसतं, अस माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. या कार्यक्रमाला विक्रम गोखलेही हजर होते. सुशीलकुमार शिंदे दुसऱ्या पक्षात गेले असते तर त्यांना बरंच काही मिळालं असतं असं वक्तव्य केलं होतं. त्यालाच शिंदे यांनी उत्तर दिलं.

कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधत. सरहद संस्थेच्यावतीने लेफ्टनंट जनरल मोती दार यांना सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते कारगिल गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले, यावेळी ते बोलत होते.

यावेळी त्यांच्या अगोदर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी त्यांच्या भाषणात सुशीलकुमार शिंदे यांना उद्देशून म्हटले होते की,  दुसर्‍या पार्टीत सुशील कुमार शिंदे गेले असते तर खूप काही मिळालं असतं. यावर शिंदे यांनी उत्तर देतांना, मला काँग्रेस पक्षाने मला सारं काही दिलं असून मी दुसऱ्या पक्षात गेलो असतो तर काहीही मिळालं नसतं.  तसेच, आज जे लोक त्या पक्षात गेले आहेत ते गप्प बसले आहेत असं सुशीलकुमार शिंदे यांनी म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला होता. यावेळी लेफ्टनंट जनरल डी. एस. हुडा, सरहद संस्थेचे संजय नहार तसेच संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.