News Flash

पिंपरी-चिंचवडमध्ये ५१ हजार घरगुती तर ५०० सार्वजनिक गणपती बाप्पांचं विसर्जन

विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार नाही

पिंपरी - शहरात शांततेत गणेश विसर्जन पार पडले.

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर’ या म्हणत पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी विघ्नहर्त्याला भाविकांनी निरोप दिला. यावर्षीचा गणेशोत्सव करोनाचा पार्श्वभूमीवर अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला गेला. शहरातील ५२१ सार्वजनिक तर ५१ हजार ४१० घरगुती गणपतींचे मंगळवारी रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही तर विसर्जन अत्यंत शांततामय वातावरणात पार पडले, अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त आर. आर. पाटील यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरातील काही सार्वजनिक गणपती मंडळांनी गणेशोत्सव साजरा न करण्याचे ठरवले होते. तसे आवाहन देखील पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी केले होते. त्यानुसार, मोजक्याच मंडळांनी अत्यंत साध्या पद्धतीने गणपती बाप्पांच्या मूर्तीचे प्रतिष्ठापना केल्याचं पाहायला मिळालं. दरवर्षी मंडळांमध्ये सजावटी, डेकरोशन आणि देखावा करण्यासाठी चढाओढ असते. मात्र, यावर्षी करोना संकटामुळे बाप्पांची आराधना करत अत्यंत साध्या रुपात गणपतीचे आगमन झाले होते.

शहरात दरवर्षी हजारो सार्वजनिक गणपती मंडळं गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात. मात्र, यंदा पोलीस आयुक्तांनी केलेल्या आवाहनाला मंडळांनी प्रतिसाद देत ५० टक्केच गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली. दरम्यान, शहरातील ५२१ सार्वजनिक गणपती मंडळांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करत कृत्रीम हौदात जाग्यावरच विसर्जन केले. त्याचप्रमाणे ५१ हजार ४१० घरगुती गणपतीला घरात आणि महापालिकेने मूर्तीदान कक्ष उभारलेल्या ठिकाणी मूर्तीदान करत गणरायाला निरोप दिल्याचे पाहायला मिळाले. एकूणच यावर्षीचा अत्यंत साध्या पद्धतीने डीजेच्या दणदणाटाशिवाय बाप्पांचे विसर्जन झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2020 3:56 pm

Web Title: immersion of 51000 household and 500 public ganpati bappas in pimpri chinchwad aau 85 kjp91
टॅग : Ganesh Festival
Next Stories
1 वेळीच रुग्णवाहिका मिळाली असती तर वाचला असता पत्रकार पांडुरंग रायकर यांचा जीव!
2 गणेश विसर्जन : पुणे पोलिसांनी मानले ‘या’ शब्दांत आभार
3 पुणे : करोनामुळं ४२ वर्षीय पत्रकाराचा मृत्यू
Just Now!
X