News Flash

बहुशाखीय, सर्वसमावेशक शिक्षणाची उच्च शिक्षणात अंमलबजावणी

व्यावसायिक, कौशल्य आणि तंत्रशिक्षणासह पदवीस्तरावरील सर्व अभ्यासक्रमांमध्ये या पद्धतीने शिक्षण प्रक्रिया राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

पुणे : उच्च शिक्षणामघ्ये बहुशाखीय, सर्वसमावेशक शिक्षणाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना दिले .

व्यावसायिक, कौशल्य आणि तंत्रशिक्षणासह पदवीस्तरावरील सर्व अभ्यासक्रमांमध्ये या पद्धतीने शिक्षण प्रक्रिया राबवण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.यूजीसीचे अध्यक्ष डॉ. डी. पी. सिंग यांनी या बाबत  निर्देश दिले . नव्या शैक्षणिक धोरणात  सर्वसमावेशक शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, सामाजिक, भावनिक, मानसिक, शारीरिक विकासावर   भर देण्याबाबत नमूद करण्यात आले आहे. कला, मानव्यता, भाषा, विज्ञान, सामाजिक शास्त्र, व्यावसायिक, कौशल्य विकास, तंत्रशिक्षण अशा शाखांतील या शिक्षणाच्या माध्यमातून २१ व्या शतकासाठी आवश्यक क्षमता विकसित होण्यास मदत होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 22, 2021 12:20 am

Web Title: implementation multidisciplinary inclusive education higher education akp 94
Next Stories
1 पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा ८ ऑगस्टला
2 महत्त्वाकांक्षी नदीसंवर्धन प्रकल्पाला गती
3 आजीव सभासदत्व मिळवून देण्याच्या बहाण्याने साहित्यप्रेमींची फसवणूक
Just Now!
X