22 October 2020

News Flash

दिवाळीच्या आधी शाळा सुरु करणे अशक्य-अजित पवार

पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं वक्तव्य

उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार. (संग्रहित छायाचित्र - अजित पवार/ट्विटर)

दिवाळीच्या आधी शाळा सुरु करणे अशक्य आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात म्हटलं आहे. काही राज्यांनी शाळा सुरु केल्या आणि त्यानंतर त्याचे परिणामही भोगले असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. वर्षभरापूर्वी कुणी सांगितलं असतं की करोनासारखा रोग येणार आहे आणि सगळ्यांना घरात बसावं लागेल तर कुणाचा विश्वास बसला नसता. हे संकट ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाउन घोषित केला आहे. देशात सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. केरळमध्येही करोनाचा प्रादुर्भाव होता पण त्यांनी तो आटोक्यात आणला. आता पुण्यातही करोना आटोक्यात आला पाहिजे ती आपली सगळ्यांची जबाबदारी आहे असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

देशात पहिला रुग्ण पुण्यात आढळला आहे. तेव्हा आजअखेर प्रत्येक सण घरीच साजरे करावे लागले आहे. त्यामुळे आजच्या उपक्रमा अंतर्गत देशातील पहिले शहर करोना हद्दपार करून दाखवू असा संकल्प करू या असे आवाहन त्यांनी केले. तसेच ज्यांनी करोनाला ज्यांनी हलक्यात घेतले त्यांना त्याची जबर किंमत मोजावी लागली आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 6:53 pm

Web Title: impossible to start school before diwali says ajit pawar scj 81 svk 88
Next Stories
1 पुणे : तरुणीची आत्महत्या, प्रियकराला पाठवलेल्या शेवटच्या मेसेजमध्ये म्हणाली…
2 आम्ही दिलदार आहोत : सुप्रिया सुळेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
3 पुणे महापालिकेने ‘त्या’ कामावर लक्ष द्यायला पाहिजे होते : अजित पवार
Just Now!
X