पुणे जिल्ह्यातील घोडेगावमध्ये बिबट्याने दुचाकीवर हल्ला करत सात जणांना जखमी केले. ही घटना शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. बिबट्याच्या हल्ल्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी घुलेवाडी येथील धनगराचा घोडा एका बिबट्याने ठार केला होता. तर आज भीमाशंकर-घोडेगाव रस्त्यावरील धोंडमाळ-शिंदेवाडी येथे पाच दुचाकीस्वारांवर हल्ला करुन सात जण जखमी केल्याची माहिती मिळते.
बिबट्याचे हल्ले वाढू लागल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून या नरभक्षक बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 6, 2018 5:58 am