माओवाद्यांशी संबंधित आणि साईबाबाचा खटला आंध्रप्रदेशमध्ये ट्रान्सफर करायचा आहे. वारवरा राव यांनी त्यासाठी आंध्रप्रदेशमधील काही राजकारणी आणि न्यायपालिकेत काम करणाऱ्या लोकांशी त्याबाबत बोलणी केली तसेच नोटाबंदीच्या काळात वारवरा रावने सुरेंद्र गडलींगला पैसे पुरवले. या दोघांमध्ये सातत्याने पत्रव्यवहार देखील झाला आहे असा युक्तिवाद उज्वला पवार यांनी केला. आरोपींकडून कंप्युटर, पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क या गोष्टी जप्त करण्यात आल्याचे निर्दशनास आणून दिले.

भिमा कोरेगाव दंगली प्रकरणी आज पुणे न्यायालयात वरवरा राव, अरूण परेरा आणि वर्नन गोन्सालवीस या तिघांना हजर करण्यात आले होते. सरकारी न्यायाधीश किशोर वढणे यांच्यापुढे सुनावणी झाली.यावेळी सरकारी वकील म्हणून उज्वला पवार तर आरोपींचे वकील रोहन नहार यांनी काम पाहिले.यावेळी युक्तिवाद करताना सरकारी वकील उज्वला पवार म्हणाल्या की, आरोपींना त्यांच्या भाषेमधे अटक वॉरंटची माहिती देण्यात आली आहे. त्यांच्या कोणत्याही आरोपामध्ये तथ्य नाही असे सांगत त्यांनी आरोपीने पोलिसांवर केलेले आरोप खोडून काढले.

त्या पुढे म्हणाल्या की, पोलिसांनी अटक केलेले आरोपी हे सीपीआय माओईस्ट या बंदी घातलेल्या संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. या आरोपींनी लोकांना सरकारच्या विरोधात युद्ध करण्यासाठी भडकवले असून माओवादी नेपाळमधून शस्त्र विकत घेणार होते‌. त्यासाठी मणीपुरमधील माओवादी मदत करणार होते असा त्यांनी युक्तिवाद केला.