20 September 2020

News Flash

देव तारी त्याला कोण मारी! पिंपरीमध्ये हायटेंशन तारेला चिटकलेला तरूण थोडक्यात बचावला

जखमी झाल्याने रुग्णालयात उपचार सुरू

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात एक तरुण विद्युत प्रवाह असलेल्या हायटेंशन तारेला चिटकला होता. मात्र, काही क्षणात तो फेकला गेला. यात तो गंभीर भाजला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अद्याप जखमी असलेल्या तरुणाच नाव समजू शकलेलं नाही. हा तरुण पत्र्याच्या छतावरील भंगार जमा करत होता. तेव्हा, ही दुर्घटना घडली अशी माहिती येथील स्थानिकांकडून मिळाली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली मोरे वस्ती येथील सूर्या हॉटेलमध्ये काम करणारा तरुण आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास हॉटेलच्या पत्र्याच्या छतावर गेला होता. हा तरुण भंगार जमा करत असताना काही फुटांवर विद्युत प्रवाह असलेल्या हायटेन्शन तारेने त्याला खेचून घेतले. काही कळायच्या आत त्याच्या अंगावरील कपडे जळून गेले. यात तो गंभीर जखमी झाला. प्रत्यक्ष घटना पाहणाऱ्या नागरिकांचा हे पाहून थरकाप उडाला होता. काही क्षण त्याच ठिकाणी निपचित पडल्यानंतरर तो हायटेंशन तारेच्या बाजूला आला आणि बचावला. या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरातून गेलेल्या हायटेन्शन तारांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 9:56 pm

Web Title: in pimpri a young man was stuck to high tension wire but he was saved msr 87 kjp 91
Next Stories
1 झटपट पैसा कमावण्यासाठी युट्युबवरील व्हिडिओ पाहून छापल्या बनावट नोटा; बहिण-भावाला अटक
2 खळबळजनक! पुण्यात होम क्वारंटाइन असलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या
3 दाभोलकर हत्याप्रकरण : विशेष कोर्टानं फेटाळला विरेंद्र तावडे, विक्रम भावे यांचा जामीन
Just Now!
X