पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात १८१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून, २६७ जण करोनामुक्त झाले आहेत. तर, दिवसभरात दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील एकूण बाधित रुग्णांची संख्या ९४ हजार २६८ वर पोहचली आहे.
यापैकी ९१ हजार ३२ जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ७९७ असल्याची माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
दरम्यान, राज्यात आज दिवसभरात ४ हजार २५९ नवे करोनाबाधित आढळले, तर ८० रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. याशिवाय ३ हजार ९४९ जण करोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाली. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता १८ लाख ७६ हजार ६९९ वर पोहचली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ९३.४६ टक्के आहे. सध्या राज्यात ७३ हजार ५४२ अॅक्टिव्ह केसेस असून, १७ लाख ५३ हजार ९२२ जण करोनामुक्त झाले आहेत. याशिवाय आतापर्यंत राज्यात ४८ हजार १३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद देखील झाली आहे.
करोना व्हायरसवर मात करण्यासाठी लस अखेर दृष्टीपथात आली आहे. आतापर्यंत जगभरात सहाकोटी पेक्षा जास्त नागरिकांना या व्हायरसची लागण झाली आहे. पंधरा लाखापेक्षा जास्त नागरिकांनी या व्हायरसमुळे प्राण गमावले आहेत. जानेवारीपर्यंत दोन आणि त्यानंतर एप्रिलपर्यंत चार लसी वापरासाठी उपलब्ध होतील, अशी सरकारला अपेक्षा आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 12, 2020 9:43 pm