सुनेला इंग्रजी बोलत येत नाही म्हणून सासरच्या मंडळींनी सुनेला मानसिक त्रास देत तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. गुरुवारी पीडित नवविवाहित महिलेने गळफास घेऊन आपल जीवन संपवलं. सारिका उर्फ प्रतीक्षा गणेश पाटील (२०) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी मयत महिलेचा भाऊ रवींद्र गलांडे याने पतीसह सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली आहे. वाकड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

सविस्तर माहिती अशी की,मयत सारिका उर्फ प्रतीक्षा हीचा विवाह गणेश डांगे पाटील याच्याशी दोन महिन्यांपूर्वी झाला होता. गणेश हा पिंपरी-चिंचवड मध्ये चालक म्हणून काम करतो. गणेश पती गणेश, सासू, नणंद हे सारीकाला इंग्रजी बोलता येत नाही म्हणून वारंवार त्रास देत होते

तसेच लग्नापूर्वी तिच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेची माहिती दिली नाही या मुद्यावरुन तिला मानसिक त्रास देत होते. या विषयी दोन दिवस अगोदर तिने भाऊ रवींद्र गलांडे याला फोनवरून माहिती दिली होती. गुरुवारी दुपारी पती गणेश कामावर तर सासू ही घराबाहेर असताना मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या सारिकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास वाकड पोलीस करत आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही.