पुणे शहरात आज दिवसभरात करोनाचे १ हजार ५१२ नवे रुग्ण आढळले असून, ३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर पुण्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ४० हजार ७१५ वर पोहचली आहे.

आजअखेर १ हजार ३५ रुग्णांचा शहरात करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, करोनावर उपचार घेणार्‍या ८०५ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले. आज अखेर २४ हजार २४६ जणांनी करोनावर मात केली असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

मागील २४ तासांमध्ये महाराष्ट्रात ७ हजार १८८ करोना रुग्ण बरे होऊन गेले आहेत.त्यामुळे आत्तापर्यंत डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार २१७ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. यामुळे महाराष्ट्रातील बरे झालेल्या रुग्णांची संख्या म्हणजेच रिकव्हरी रेट ५५.७२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान आज राज्यात ८ हजार ३६९ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात २४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातला मृत्यू दर ३.७५ टक्के इतका झाला आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे.