पुणे शहरात आज दिवसभरात ७८१ नवे करोनाबाधित आढळले, तर १८ रुग्णांचा मृत्यू झाला. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या ५८ हजार ३०४ झाली आहे.

आजअखेर १ हजार ३८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या १ हजार ८२२ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आजअखेर ३९ हजार ९३९ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

करोनावरची लस शोधण्याचे प्रयत्न अनेक देशांमध्ये सुरु आहेत. काही ठिकाणी तिसऱ्या टप्प्यातलीही चाचणी सुरु आहे. मात्र लस आली म्हणजे परिस्थिती जादूची कांडी फिरवल्यासारखी बदलेल असं होणार नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेंड्रोस अँधोनम घेब्रेयेसस यांनी हे वक्तव्य केलं आहे. पुढचे काही महिने ही करोना नावाची महासाथ असू शकते असाही इशारा WHO ने दिला आहे.